दिल्ली सीमांवरील तंबू हटू लागले sakal
देश

दिल्ली सीमांवरील तंबू हटू लागले

गाझीपूर सीमेवर आनंद व्यक्त करताना शेतकरी आणि महिला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे मागे घ्या, यासारख्या घोषणांनी गेले ३७८ दिवस दणाणून गेलेल्या दिल्लीच्या टीकरी, सिंघू व गाझीपूर सीमांवर आंदोलक शेतकऱ्यांमध्ये आज वेगळाच उत्साह दिसत होता. संयुक्त किसान मोर्चाच्या ५ सदस्यीय उच्च स्तरीय समितीच्या नेत्यांनी दुपारी १२ ला बोलावलेल्या बैठकीनंतर बाहेर येऊन आंदोलन सध्या मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली त्याक्षणी उपस्थित हजारो अन्नदात्यांनी या यशाचा जल्लोष सुरू केला. पंजाबी गाण्यांच्या ठेक्यावर नाचत-गात व शेतकरी एकतेच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी आनंदाला वाट मोकळी करून दिली.

हा जल्लोष सायंकाळपर्यंत दिल्लीच्या सीमांवर सुरू होता. कडाक्याची थंडी, ऊन, पाऊस या कशालाही न जुमानता आणि सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या आरोपांनी न डगमगता शेतकऱ्यांनी वर्षाहून जास्त याच दिल्लीच्या सीमांवर किल्ला लढविला. त्या आंदोलनाला यश मिळाल्याचा आनंद प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. पंजाबी लोकगीतांतून या आनंदाचे स्वर वातावरणात आगळी चमक निर्माण करत होते.

हा अहंकाराचा पराभव : काँग्रेस

कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आज अखेर शेतकरी संघटनांनी आपले ऐतिहासिक आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या सांगतेनंतर काँग्रेसने मोदी सरकारला ‘हा अन्नदात्यांचा विजय आणि अहंकाराचा पराभव’ असल्याचा टोला लगावला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींनी शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचे स्मरण केले. आपला देश महान आहे, इथे सत्याग्रही किसान आहे. सत्याच्या या विजयामध्ये आम्ही हुतात्मा अन्नदात्यांचे स्मरण करतो, असे ट्विट राहुल गांधींनी केले. तर, माध्यम विभागाचे प्रमुख आणि सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारच्या अहंकाराचा पराभव असल्याचा टोला लगावला. अहंकार नेहमी पराभूत होतो याचा इतिहास साक्षीदार आहे. मग तो रावणाचा असो की प्रचंड बहुमताच्या मोदी सरकारचा असो, अशी टिप्पणी केली.

नवी दिल्ली: आंदोलन मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर गुरुवारी गाझीपूर सीमेवर आनंद व्यक्त करताना शेतकरी आणि महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT