Jammu Terror Attack 
देश

Jammu Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांचा हल्ला

पुंछमधील सुरनकोट भागातील डेरा की गली, ज्याला डीकेजी म्हणूनही ओळखले जाते, येथे लष्कराच्या ट्रकवर हल्ला करण्यात आला.

Sandip Kapde

Jammu Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला करून गोळीबार करण्यात आला. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत या भागातील लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. तेथे अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.

पुंछमधील सुरनकोट भागातील डेरा की गली, ज्याला डीकेजी म्हणूनही ओळखले जाते, येथे लष्कराच्या ट्रकवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात राजौरीतील कालाकोट येथे लष्कर आणि विशेष दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर दोन कॅप्टनसह सैनिक शहीद झाले होते.

हा भाग दहशतवाद्यांचा बालेकिल्ला आणि गेल्या काही वर्षांत लष्करावरील मोठ्या हल्ल्यांचे केंद्र बनला आहे. या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात राजौरी-पूंछ भागात झालेल्या दुहेरी हल्ल्यात 10 जवान शहीद झाले होते. (Latest Marathi News)

2003 ते 2021 दरम्यान, हा परिसर दहशतवादापासून मोठ्या प्रमाणात मुक्त झाला, त्यानंतर वारंवार चकमकी सुरू झाल्या. गेल्या दोन वर्षांत या प्रदेशात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये 35 हून अधिक जवान शहीद झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT