The Indian Army shot dead three terrorists 
देश

दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत पाकिस्तानचा अडथळा; मृतदेह ताब्यात घेत असताना भारतीय लष्करावर गोळीबार

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत आज तीन दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं आहे. तीन दहशतवादी पाक व्याप्त जम्मूतील नियंत्रण रेषेतून जम्मू-काश्मिरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी भारतीय जवानांनी त्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांचे मृतदेह मिळवण्यात यश आले आहे. पण, तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेत असताना पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. त्यामुळे तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात अडथळा येत आहे. 'एक्स'वर याची माहिती देण्यात आली आहे.

जम्मूच्या उरी भागात लष्कराची कारवाई सुरु आहे. यावेळी तीन दहशतवाद्यांचा कारवाईत मृत्यू झालाय. भारतीय लष्कर आणि काश्मिर पोलिस यांच्याकडून संयुक्त ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तान अडथळा निर्माण करत असल्याचं सांगण्यात आलंय. सकाळी बारामुल्लातील उरी सेक्टरमध्ये तीन दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय लष्कराने त्यांना ठार केले.

ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांचे मृतदेह भारतीय सैन्याने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. पण, तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेत असताना पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला आहे. ऑपरेशन सध्या सुरु असल्याची माहिती लष्कराने दिलीये. (Latest Marathi News)

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. भारतीय लष्कराच्या चार अधिकाऱ्यांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने कारवाई कठोर केली होती. आज तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. भारतीय लष्कराकडून अजून शोध मोहीम सुरु आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयातच फजिती? राहुल गांधींच्या SIR याचिकेत १४ त्रुटी, २२० रुपयेही कमी; सुनावणीच रखडली!

Solapur Road Accident: बहिणीला भेटून गावाकडे परतत होते; अज्ञात वाहनाची धडक, ४८ वर्षीय भावाचा मृत्यू

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, पाऊस परतणार?; कोकणात पावसाचा अंदाज

Pune Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर; पुणे जिल्ह्यातील १,७१८ शेतकऱ्यांना लाभ

Pune News: पुण्यात मोठी पाणी कपात! दर गुरुवारी नळाला पाणी येणार नाही; १५ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, महापालिकेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT