Jammu Kashmir: अनंतनागनंतर आता बारामुल्लामध्येही चकमक; सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, एक दहशतवादी ठार

encounter between terrorists and  Army Baramulla Police one terrorist has been killed in Jammu Kashmir
encounter between terrorists and Army Baramulla Police one terrorist has been killed in Jammu Kashmir esakal

अनंतनागमधील चकमकीदरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील उरी, हातलंगा या फॉरवर्ड भागात देखील दहशतवादी आणि लष्कर आणि बारामुल्ला पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला असून पोलीस आणि सुरक्षा दलांकडून इतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. या परिसरात 3 आतंकवादी असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर शोधमोहिम सुरू होती. दरम्यान दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मागच्या चार दिवसांपासून संयुक्त कारवाई सुरू आहे.

काश्मीरमधील कोकेरनाग भागात अजूनही दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोकेरनागच्या गडोलेच्या जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे. लवकरच दहशतवाद्यांचा खात्मा केला जाईल, असे जम्मू-काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे.

सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर ड्रोनचाही वापर करत आहे, या ड्रोन्सच्या कॅमेऱ्यांनी दहशतवाद्यांच्या हालचाली देखील टिपल्या आहेत. दहशतवादी डोंगर आणि जंगलात लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे.

encounter between terrorists and  Army Baramulla Police one terrorist has been killed in Jammu Kashmir
Mahadev App Scam: चार्टर प्लेन, वेडिंग प्लॅनरला १२० कोटी; लग्नावर २०० कोटी उडवणारा सौरभ चंद्राकर आहे तरी कोण?

सुरक्षा दलाची दहशतवाद्यांविरोधात शेध मोहीम सुरूच आहे. दहशतवाद्यांचा छडा लावण्यासाठी लष्कराने डोंगराला वेढा घातला आहे. क्वाडकॉप्टर, ड्रोन आणि इतर आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. पॅरा कमांडोजनीही कारवाईत सहभागी झाले आहेत. घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग यामुळे हे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय टेकडीवर दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणावर रॉकेट देखील डागण्यात आले आहेत.

encounter between terrorists and  Army Baramulla Police one terrorist has been killed in Jammu Kashmir
Kishor Kadam : ''होईल जनतेचं जे व्हायचं, आपल्याला काय.. आपण बोलून निघून जायचं...''; सौमित्रची कविता व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com