Mamata Banerjee ANI
देश

TMC म्हणजे टेम्पल-मॉस्क-चर्च; ममतांची गोव्यासाठी नवी रणनीती

कार्यकर्ता मेळाव्यात केली विजयाची चाचपणी

Amit Ujagare (अमित उजागरे)

पणजी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. पणजीत त्यांनी सोमवारी कार्यकर्ता मेळावा घेतला, या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विजयाची चाचपणीही केली. तसेच TMC म्हणजे टेम्पल-मॉस्क-चर्च असा आपल्या पक्षाचा एक वेगळा अर्थ सांगितला.

ममता बॅनर्जींनी TMCचा अर्थ टेम्पल-मॉस्क-चर्च असा करताना हिंदू-मुस्लीम-ख्रिश्नच मतदारांना पक्षाकडं खेचण्याचा प्रयत्न केला आहे. गोव्यात हिंदू बरोबरच मुस्लीम आणि मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्मियांची संख्या आहे. या पार्श्वभूमीवर ममतांचं नवं राजकारण इथं पहायला मिळणार आहे.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना ममता म्हणाल्या, TMC म्हणजे टेम्पल-मॉस्क-चर्च. आम्ही भाजपविरोधात लढत आहोत. या ठिकाणी जिंकण्याची संधी आहे का? आपण जिंकू असा तुम्हाला विश्वास वाटतो का? जर तुम्हाला विश्वास आहे तर पाऊल मागे घेऊ नका, पुढे जात राहा.

आपण गोव्यात मतविभाजन करण्यासाठी आलेलो नाही तर मतं एकत्र करण्यासाठी आणि तृणमूलच्या आघाडीला विजय मिळवून देण्यासाठी इथं आलो आहोत. ही आघाडी भाजपला पर्याय आहे. जर कोणाला आमच्यासोबत यायचं असेल तर त्यानं यावं. कारण आम्ही आधीच निर्णय घेतलाय लढायचं आणि मरायचं पण माघार घ्यायची नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT