Dream House esakal
देश

Dream House : दीड कोटींचे घर वाचवण्यासाठी शेतकऱ्याची शक्कल

रस्ते विस्तारीकरणात नवे रस्ते बनवत असताना बहुतेक लोकांना आपली जमीन-घर गमवावे लागतात. त्या बदल्यात त्यांना चांगला मोबदला दिला जातो. पण स्वतःच्या घराचे महत्व वेगळेच असते. पंजाबच्या एका शेतकऱ्याचे ड्रीम हाऊस असेच जाणार होते. पण त्याने लढवलेल्या शक्कलमूळे ते वाचले.

सकाळ डिजिटल टीम

दीड कोटी रूपयांचे बनवले होते घर

नव्याने तयार होणाऱ्या एक्सप्रेस वेमुळे पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील शेतकरी सुखविंदर सिंह सुखी यांचे घर जाणार होते. त्यांनी दीड कोटी लाऊन आपले ड्रीम हाऊस बनवले होते पण दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे मध्ये आला. ज्यामुळे मोबदला घेऊन घर नष्ट होताना बघावे या शिवाय अजून काही पर्याय नव्हता. मात्र या शेतकऱ्याच्या जिद्दीमुळे एक अनोखा उपाय केला. या उपयाचा वापर परदेशात कधीपासूनच होत आहेत. मात्र भारतात फार प्रचलीत नाही.

घेऊन गेले ५०० फूट लांब

सूखविंदर यांनी आपल्या दूमजली घराला वाचवण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ५०० फूट आत नेत आहेत. त्यांनी आधीच २५० फूट आत नेले आहे. २५० फूट शिफ्ट करायचे बाकी आहे.

सुखविंदर यांच्या या घराची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे. हे घर शिफ्ट करताना या गोष्टीची विशेष काळजी घेतली जात आहे की, घराला कोणतेही नुकसान पोहचू नये. या शिफ्टींगसाठी घराच्या पायाखाली चाके लावून हे घर शिफ्ट केले जात आहे. दोन महिन्यांच्या मेहनती नंतर २५० फूट मागे सरकवले गेले आहे. असे सांगितले जात आहे की, ५०० फूट मागे सरकण्यासाठी एकूण ४० लाख रूपये खर्च येणार आहे.

मोबदला घेण्यास दिला नकार

सुखविंदर यांनी कधी विचार नव्हता केला की, त्यांना त्यांचे अर तिथून हलवावे लागेल. पण एक्सप्रेसवे मुळे त्यांना हे करावे लागले आहे. घर अजून एकदम नवीन आहे. त्यामुळे त्यांना आपले घर तिथून शिफ्ट करणेच योग्य वाटले. त्यांना सरकारने मोबदला देऊ केला होता पण त्यांनी तो घेण्यास नकार दिला.आणि शिफ्ट करणेच योग्य समजले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल

SCROLL FOR NEXT