Dream Home: घर घेण्याचा विचार करताय? बजेट कसं करावं? जाणून घ्या

तुम्ही जर ड्रिम हाऊस घेण्याचा विचार करत असाल तर त्या आधी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
how to plan a budget for dream home
how to plan a budget for dream homesakal

प्रत्येकाला असं वाटतं की आपलं एक हक्काच ड्रिम हाऊस घ्यावं पण अनेकदा बजेट नसल्याने ते राहून जातं. पण तुम्ही जर ड्रिम हाऊस घेण्याचा विचार करत असाल तर त्या आधी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

घर घेताना अनेक प्रश्न मनात येतात मग ते डाऊन पेमेंट असो किंवा बजेट असो किंवा लोन. यामुळे अनेकदा आपण घर घेण्याचा विचार टाळतो. चला तर जाणून घेऊया.

how to plan a budget for dream home
Paytm Home Series: सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका - ऑस्ट्रेलिया करणार भारत दौरा

घर विकत घेताना बजेट काय असावा?

घर विकत घेताना बजेटसाठी एक थंब रुल आहे ‘5-20-40’ याचा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला का? चला तर जाणून घेऊया.

तुमच्या घराची किंमत ही तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या पाच टाईमने मोठी नसावी. जर तुम्ही कर्ज घेत असला तर त्या कर्जाचा कालावधी हा 20 वर्षासाठी नसावा. तुमचं वार्षिक उत्पनाच्या 40 टक्के हा तुमचा जास्तीत जास्त EMI amaunt असावा. आणि सर्वात महत्त्वाचे ड्रीम हाउस घेताना फॅमिली income चा विचार करावा. तरचं घर घेणे सहज शक्य आहे.

how to plan a budget for dream home
Home Loan : RBI च्या निर्णयामुळ गृहकर्ज महागलं; कर्जाच्या हप्त्यात होणार वाढ

घर केव्हा घेणे योग्य?

जिथल्या लवकर तुम्ही घर घ्याल तितकं चांगल आहे. जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी घरासाठी लोन घेण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो पण जर तुम्ही 20 व्य वर्षी लोन घ्याल तर तुम्हाला सहज लोन मिळणारं. ज्यामुळे तुम्हाला घर घेणे सहज सोपं जाणार.

how to plan a budget for dream home
Home Loan Tips: गृहकर्ज घेताय! या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा

तुम्ही तुमचं घर फायनन्स कसं कराल?

कॅश देऊन तुम्ही घर फायनन्स करू शकता. जे खूप कमी लोकांसाठी शक्य आहे पण लोन किंवा कर्ज घेऊन तुम्ही घराचं फायनन्स उत्तमपणे घेऊ करू शकता जे अनेक जण करतात.

घर घेण्यापूर्वी या चार गोष्टी समजून घ्या

१. हाउस प्रॉपर्टी घेताना वेबसाईट चेक करा. बिल्डरच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका स्वत: माहिती काढा.

२. Under Construction प्रॉपर्टी घेण्यापेक्षा तयार झालेली प्रॉपर्टी घेणे केव्हापण चांगले असते.

३. घर घेताना होम insurance योग्य आहे का तपासा.

४. घर घेताना पैशाच्या देवाण घेवाण सोबत स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, ब्रोकेरेज, पार्किंग, maintenance, home loan fees, आणि Under Construction प्रॉपर्टी घेताना GST योग्य तपासा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com