Supreme Court esakal
देश

Supreme Court : नैतिकता किती खालावली? काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशावर SC चे खडे बोल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - गोव्यातील काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मुद्दावर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक प्रतिक्रिया दिली आहे. आता आपली नैतिकता कोणत्या पातळीपर्यंत खालावली, असा कठोर प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालय पक्षांतरबंदी कायद्यावर सुनावणी घेणार आहे. ही सुनावणी एक वर्षानंतर होणार आहे. (Supreme Court news In Marathi)

गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडनकर यांच्याद्वारे दाखल याचिकेवर २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचे आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या १२ आमदारांच्या कथितरित्या भाजप प्रवेशाबाबत न्यायमूर्ती आरएम शाह आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

चोडणकर यांच्या वकिलांनी या कायदेशीर मुद्द्यावर विचार करण्यास कोर्टाला विनंती केली. तसेच नुकतच काँग्रेसच्या ९ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर न्यायमूर्ती शहा म्हणाले की, आपली नैतिकता किती प्रमाणात ढासळली आहे. मात्र, या प्रकरणात घाई करण्याची गरज नसून यावर पुढील वर्षी विचार करता येईल, असं न्यायालयाने म्हटलं.

गोवा विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गोव्यातील नव्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी ही याचिका दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा: Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT