Mamata-Banerjee e sakal
देश

ममता बॅनर्जी यांना माझगाव न्यायालयाचे समन्स

दोन मार्चला हजर राहण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रगीताचा (National Anthem disrespect) अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने समन्स (Mazgaon court summons) बजावले. येत्या दोन मार्च रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आज देण्यात आले. गतवर्षी डिसेंबरमध्ये मुंबईत (Mumbai) आयोजित केलेल्या कार्यक्रमात बॅनर्जी हजर होत्या. यावेळी राष्ट्रगीत सुरू असताना दोन ओळी म्हटल्यावर त्या अचानक थांबल्या आणि कार्यक्रमातून निघून गेल्या.

याबाबत भाजप कार्यकर्ते विवेकानंद गुप्ता यांनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली होती. ममता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत दाखल केलेल्या ध्वनिचित्रफीत, यू-ट्युब लिंक, डीव्हीडी आदी पुराव्यांवरून ममता यांनी राष्ट्रीय सन्मान कायद्याच्या कलम ३ नुसार गुन्हा केला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असल्या तरी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कायदेशीर संमतीची आवश्यकता नाही. त्यामुळे कारवाई बाबतीत कोणतीही अडचण नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आणि येत्या दोन मार्चला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT