
ममता बॅनर्जी-शरद पवार भेट; नवाब मलिकांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज (ता.1) डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थानी 'सिल्व्हर ओक'वर भेट घेणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.
ममता बॅनर्जी-शरद पवार भेट, राजकीयदृष्ट्या महत्वाची भेट
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर ममता बनर्जी (mamta banergee) तृणमुल कॉंग्रेसचा (Trinamool Congress) राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे त्या काही दिवसांपासून त्या देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना काल (मंगळवारी) ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आज ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांसोबतची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
नवाब मलिकांनी दिली महत्वाची माहिती
2024 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल केवळ पश्चिम बंगालपुरते मर्यादित राहणार नाही, असा स्पष्ट संदेश ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही महिन्यांत दिला आहे. मात्र, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, ममता दीदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, त्या पवारसाहेबांना भेटणार आहेत. बैठकीनंतर त्या पत्रकारांना संबोधित करून चर्चेची माहिती देतील.
हे तर अशक्य...
तृणमूल या क्षणी काँग्रेसला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत मलिकांना विचारले असता, तेव्हा त्यांनी सांगितलं की तृणमूल पश्चिम बंगालच्या बाहेर आपला पाया स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक पक्षाला हा अधिकार आहे. पण काँग्रेसला बाहेर ठेऊन भाजपच्या विरोधात एकसंध विरोधक उभारणे हे जवळपास अशक्य आहे.
हेही वाचा: शेतकरी आंदोलन घेणार मागे? आज सिंघू बॉर्डरवर संघटनांची बैठक
तृणमूलकडून भाजपला सातत्याने आव्हान देण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादीचे नेते मलिक यांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या भेटीचे वर्णन सामान्य भेटीसारखं केलं असलं तरी तृणमूलने भाजपला सातत्याने आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात जोरदार वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते तृणमूलमध्ये सामील झाल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाली आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात मात देण्याच्या दृष्टीने या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जात आहे. ममता बॅनर्जी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितलं होतं. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस भाजपविरोधातील मोठा पक्ष असेल, असंही घोष यांनी सांगितलं होतं. मुंबई भेटीत ममता बॅनर्जी काही उद्योगपतींचीही भेट घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये व्यावसाय वाढीसाठी ही भेट असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा: Omicron - महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवे नियम
Web Title: Mamata Banerjee Meet Sharad Pawar Today Political Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..