Crime News Esakal
देश

Crime News: तिहेरी हत्याकांडाने उडाली खळबळ! बाप, मुलगा अन् मुलीची गोळ्या झाडून हत्या, धक्कादायक कारण आले समोर

Crime News: बिहारच्या बेगुसरायमध्ये तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली. बाप, मुलगा अन् मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बिहारमधील बेगुसराय येथे 25 वर्षीय विवाहित मुलगी, तिचे वडील आणि भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी ही हत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. हे जबरदस्तीचे लग्नाचे प्रकरण असल्याचे गावप्रमुखांनी सांगितलं. या कारणामुळे विवाहितेच्या सासरचे लोक तिला घरी ठेवत नव्हते.

ही घटना साहेबपूर कमल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णुपूर आहुक गावात घडली. २५ वर्षीय नीलू कुमारी, नीलूचे वडील उमेश यादव आणि भाऊ राजेश यादव अशी मृतांची नावे आहेत. हे लोक बेगुसराय जिल्ह्यातील श्रीनगर भागातील रहिवासी होते.

या घटनेबाबत साहेबपूर कमल पोलिस स्टेशनचे एसएचओ दीपक कुमार यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. उमेश यादव मुलगा आणि मुलगी नीलूसह नीलूच्या सासरच्या घरी गेला होता. उमेश जेव्हा मुलीच्या सासरच्या घरी पोहोचला तेव्हा सासरचे लोक संतापले आणि बाचाबाची झाली, असे गावकरी सांगतात.

दरम्यान, नीलू कुमारी यांच्या सासऱ्यांनी आपली बंदूक काढून तिघांनाही जवळून गोळ्या घातल्या, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

गावप्रमुख सुबोध कुमार यादव यांनी सांगितले की, हे जबरदस्ती विवाहाचे प्रकरण आहे, ज्यामध्ये मुलांचे अपहरण करून त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले जाते. यामुळेच लग्नाला दोन वर्षे उलटूनही नीलू कुमारीचे सासरचे लोक तिला त्यांच्या घरी घेऊन जात नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT