Yogi Adityanath esakal
देश

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाशी यशस्वी लढा दिला : योगी

मोदींचे केले कौतुक

सकाळ डिजिटल टीम

इटावा : काही दिवसांपूर्वी इटावा येथे वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आपण यशस्वी रित्या कोरोनाच्या विषाणूशी लढा दिला, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. राज्यात कोविडचा संसर्ग झाला तेव्हा काँग्रेस पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि समाजवाद पक्ष कुठे होते?, असा सवाल योगी यांनी विचारला. जर आपण बूथस्तरावर भाजपची ताकद वाढवली, तर पक्ष ३२५ विधानसभेच्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकेल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी भाजप (BJP) बूथ अध्यक्षांना संबोधिताना म्हणाले.

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमुळे राज्यात राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल टोपीमुळे राज्याला धोका, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे मोहम्मद जीनांविषयी केलेले विधान यामुळे सगळीकडे चर्चेला उधाण आले होते. आताही राजकीय नेते स्फोटक विधाने करण्यास मागे पुढे पाहत नसल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court ची रेल्वेच्या 'सेकंड-क्लास पॅसेंजर' शब्दप्रयोगावर नाराजी; अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

Pune: मिरज सभापती-उपसभापतींची निवड रद्द; विभागीय आयुक्तांचे फेरनिवडणुकीचे आदेश; विशाल पाटील यांना धक्का

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्यानंतर CJP संस्थापक अभिजीत दिपके यांचे बेमुदत उपोषण सुरू

Ahilyanagar: बाबा, दारू विकू नका; लेकीनं शपथ घालताच बापानं दुकानाला लावलं कुलूप, सुरू केला नवा व्यवसाय

Rohit Sharma Retirement: रोहितच्या निवृत्ती प्रकरणात मोठा ट्विस्ट! अगरकर-गंभीरवर BCCI नाराज? इनसाइड स्टोरी आली समोर,नेमक काय घडल ?

SCROLL FOR NEXT