
जयपूर : रॅलीची आवाज दिल्लीपर्यंत जाईल. महागाई हटाओ महारॅलीच्या माध्यमातून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची (Narendra Modi Government) उलट मोजणी सुरु झाली आहे, असे राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) वतीने महागाई हटाओ महारॅलीचे आज रविवारी (ता.१२) जयपूरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. महागाई हटवण्याचे जो संकल्पाचा नाद दिल्लीत बसलेल्या सरकारला ऐकू येईल. हा मुद्दा फक्त काँग्रेस पक्षाचा नाही, तर पूर्ण देशाचा आहे. आज होत असलेल्या रॅलीमुळे देशात होणाऱ्या आगामी राजकारणाची दिशा ठरवेल. जे लोक दिल्लीत घमंड आणि अहंकाराने राज्य करत आहेत. ते लोक ज्यांची नीति आणि नियत दोन्ही खराब आहे, जे लोक या देशाला अंधकारात ढकलण्याचे काम केले आहे, ज्या लोकांच्या नाकावर टिच्चून देशाच्या सीमांवर अतिक्रमण केले जात आहे. (Congress Party's Rally Against Inflation In Rajasthan)
ते लोक जे सत्तेच्या नशेत आहेत अशा लोकांना जयपूरमधून संदेश दिले पाहिजे, तुम्ही नेहमी गादीवर बसणार नाही.सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम तुम्ही केले आहे. पेट्रोल-डिझेल, फळफुलांचे भाव वाढत आहेत. त्याला जबाबदार तुम्ही लोक आहात. ज्या प्रकारे तुम्ही नाईलाजाने कृषी कायदे रद्द केले, त्याप्रमाणे जयपूरची रॅली पाहून तुम्हाला झुकावे लागेल. पायलट पुढे म्हणतात, की गेल्या सात वर्षांमध्ये देशात जनतेची फसवणूक झाली आहे. तुम्ही प्रत्येक वेळी लोकांना फसवूण, जाती, धर्माच्या आधारावर फुट पाडून मत घेऊ शकत नाहीत.
या देशात राष्ट्रीयस्तरावर जर कोणी आव्हान देऊ शकेल तर ते एकमेव काँग्रेस पक्ष आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा आम्ही मजबूतीने जाऊ तेव्हा भाजप आणि एनडीए सरकारला जरुर हरवू, असा विश्वास सचिन पायलट यांनी यावेळी रॅलीत व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.