unlock 6.jpg 
देश

Unlock 6.0 Guidelines: आजपासून अनलॉक 6.0 सुरु, जाणून घ्या काय-काय सुरु होणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अजूनही सुरुच आहे. याचदरम्यान आजपासून देशभरात अनलॉक 6.0 सुरु झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या काही गोष्टी सुरु होणार आहेत. कंटेन्मेंट झोनशिवाय इतर ठिकाणी बाहेरील व्यवहारांना वेग देण्यासाठी रविवारपासून अनलॉक 6.0 सुरु होईल. या आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्रालयाने यामध्ये आणखी सूट देणार नसल्याचे स्पष्ट करत मागील महिन्यात जारी करण्यात आलेले अनलॉक 5.0 चे दिशानिर्देश 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील, असे म्हटले होते. 

दि. 1 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यापासून कठोर नियमांचे पालन करत रेस्तराँ, चित्रपटगृहे, जिम, मॉल, शाळा, जलतरण तलाव, धार्मिक स्थान आणि मेट्रो रेल्वे सेवांना सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. 1 नोव्हेंबरपासून दिल्लीमध्ये बस पूर्ण क्षमतेने सुरु होतील आणि पश्चिम रेल्वे मुंबईत अतिरिक्त लोकल सुरु करेल. दिल्लीतून आंतरराज्य बससेवा आजपासून (दि.1) सुरु होण्याची शक्यता आहे. 

त्याचबरोबर गोव्यात कॅसिनो सुरु होईल. उत्तर प्रदेशमध्ये दुधवा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले होणार आहे. आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, हत्ती सफारी आणि जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर पुन्हा एकदा सुरु होणार असून अधिक भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जाईल.

दिल्लीत लग्न समारंभात 50 पाहुण्यांना सहभागी होण्याचा नियम हटवण्यात आला आहे. बंद कार्यालयात 200 व्यक्तिंना लग्नात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, अंत्यसंस्कारासाठी 20 जणांची मर्यादा कायम आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनचा मोठा डाव! सनराइजर्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा; टेस्ट टीममधून डच्चू मिळालेल्या स्टार खेळाडूकडे दिली टीमची धुरा

Fake Fertilizer Scam : खत म्हणून विकत होते चक्क मीठ! सोलापुरात १० लाखांच्या भेसळयुक्त खतांचा साठा जप्त; कृषी विभागाचा मोठा छापा

Mahabaleshwar Nachani Village : स्ट्रॉबेरी विसरा! महाबळेश्वरमधील 'या' गावाने ओळखच बदलली; आता थेट बनलेय 'नाचणीचे गाव', शेतकऱ्यांना मिळणार बियाणे अन् खते मोफत

Solapur IT Park : सोलापूर आयटी पार्कच्या जागेबाबत मोठा ट्विस्ट! CM फडणवीसांच्या घोषणेनंतर प्लॅन बदलला? 'त्या' 50 एकर जागेचं काय होणार? सामंतांच्या विधानाने नवा पेच

Latest Marathi News Live Update : कुल्लू-मनालीकडे मोठ्या संख्येने पर्यटक जात असल्याने तिथे गाड्यांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT