...नाहीतर तुमचे राम नाम सत्य नक्की, 'लव्ह जिहाद'वरुन योगींनी दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

वेष बदलून, नाव लपवून जे लोक मुलींच्या आयुष्याशी खेळत आहेत, त्यांना मी इशारा देतो की, त्यांची राम नाम सत्यची यात्रा निघणार आहे.

जौनपूर- उत्तर प्रदेशमध्ये 'लव्ह जिहाद'च्या वाढत्या प्रकरणांदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जौनपूर येथे अशा गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना इशारा दिला आहे. अशा लोकांनी राम नामच्या यात्रेसाठी सज्ज राहावे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे. 

योगी आदित्यनाथ म्हणाले की, शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक आदेश दिला आहे की, लग्नासाठी धर्मांतर करण्यास मान्यता मिळणार नाही. त्यामुळे सरकारही लव्ह जिहाद सक्तीने रोखण्याचे काम करण्याचा निर्णय घेत आहे. आम्ही एक प्रभावी कायदा करणार आहोत. 

वेष बदलून, नाव लपवून जे लोक मुलींच्या आयुष्याशी खेळत आहेत, त्यांना मी इशारा देतो की, त्यांची राम नाम सत्यची यात्रा निघणार आहे. आम्ही मिशन शक्तीची मोहीम यासाठीच राबवत आहोत. 

हेही वाचा- दिवाळीआधी Good News! इजिप्त, भुतानहून आलेल्या कांदे-बटाटेंमुळे कमी होणार महागाई

प्रत्येक माता आणि मुलीच्या सुरक्षेची खात्री हाच या मोहिमेचा एकमेव उद्देश आहे. तरीही कोणी प्रयत्न केला तर आमचे ऑपरेशन शक्ती आता तयार आहे. याचा एकच उद्देश आहे की, आम्ही कोणत्याही स्थिती त्यांची सुरक्षा करु. त्यांच्या सन्मानाची सुरक्षा करु. न्यायालयाच्या आदेशाचे पालन होई आणि माता-भगिनींचा सन्मानही होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm yogi Adityanath on love jihad Ram Naam Satya Journey Will Begin