Uttara Kannada Crime News esakal
देश

Karwar : पत्नी, मुलाला नदीत ढकलून व्यावसायिकानं स्वत: लावून घेतला गळफास; घटनेने कारवारात खळबळ

चित्तकुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

आई आणि मुलाचे मृतदेह देवबाग समुद्रकिनारी; तर श्यामचा मृतदेह पाडी येथे आढळून आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

बंगळूर : कारवार (Karwar) तालुक्यातील गोपाशिट्टा येथील व्यावसायिक श्याम पाटील यांची पत्नी व मुलाने काळी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर त्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

श्याम पाटील (वय ४०) हे गोव्यातील वेर्णा इंडस्ट्रियल एरियामध्ये कामगार पुरवठ्याचा व्यवसाय करत होते. मात्र, काल (ता. २८) रात्री त्यांनी पत्नी ज्योती पाटील (वय ३७) आणि १२ वर्षीय मुलगा दक्ष पाटील यांच्यासह आत्महत्या केली होती.

प्रथम कोडीबाग येथील काळी नदीत ज्योती पाटील आणि दक्ष पाटील यांना ढकलले, त्यानंतर तेथून ६० किमी अंतरावर गोव्यातील पाडी वनपरिक्षेत्रात श्याम पाटील यांनी गळफास लावून घेतला.

आई आणि मुलाचे मृतदेह देवबाग समुद्रकिनारी; तर श्यामचा मृतदेह पाडी येथे आढळून आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. चित्तकुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलयाचा धोका! भोटेकोसी नदी फुगली; ७८८ मृत्यू, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

SCROLL FOR NEXT