Koyna Dam : कोयना पाणलोट क्षेत्रात धुवांधार; नवजात 112 मिलिमीटर तर महाबळेश्‍‍वरात 127 मिलिमीटर पावसाची नोंद

कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.
Koyna Dam
Koyna Damesakal
Updated on
Summary

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह घाटमाथ्यावर संततधार पाऊस पडत असल्याने जलाशयाच्या पाणीसाठ्यात एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासांत नवजाला ११२ मिलिमीटर व महाबळेश्‍वरला (Mahabaleshwar) १२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने जलाशयाच्या पाणीसाठ्यात एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

पावसाने उघडीप न दिल्याने आजही खरिपाच्या पेरण्या बंद राहिल्या. गेली चार दिवस धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. मॉन्सूनच्या दमदार व मुसळधार पावसाची अपेक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही, त्यामुळे पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत आहे.

रात्रीपासून पावसाचा जोर धरण पाणलोट क्षेत्रात वाढला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ७३ मिलिमीटर, नवजाला ११२ मिलिमीटर व महाबळेश्‍वरला १२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा १२.२१ टीएमसी झाला असून, पाणीपातळी २०३३.१० फूट झाली आहे.

Koyna Dam
Eknath Shinde : पंढरपूरच्या आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; शिंदे म्हणाले, कोणाला डावलून..

२७ जूनला पायथा वीजगृहातून होणारा एक हजार, ५० क्यूसेस विसर्ग वाढवून पायथा वीजगृह पूर्ण क्षमेतेने सुरू करून दोन हजार १०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यास सुरुवात केली होती. आज सकाळी पुन्हा पायथा वीजगृहातून होणारा एक हजार ५० क्यूसेस करण्यात आला आहे.

Koyna Dam
Bus Accident : किंकाळ्या, आरोळ्या अन् मृत्यूचं तांडव! बुलढाण्यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, कशी घडली दुर्घटना?

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह घाटमाथ्यावर संततधार पाऊस पडत असल्याने जलाशयाच्या पाणीसाठ्यात एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. गेली चार दिवस कधी उघडीप तर कधी रिमझिम पाऊस यामुळे वापसा मिळेल, त्यावेळी शेतकरी खरिपाच्या पेरण्या करता होता.

आज सकाळी पावसाने थोडी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा दुपारी पावसाच्या सरी येऊ लागल्या आणि खरिपाच्या पेरणीत व्यत्यय आला. तीन आठवडे खरीप हंगामातील पेरण्या यावर्षी उशिरा झाल्या आहेत. अजून मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील क्षेत्रावर पेरणी झालेली नाही.

Koyna Dam
मन हेलावून टाकणारी घटना! बस अपघातात 25 लोक जिवंत जळाले, 'दुभाजक' ठरलं दुर्घटनेचं कारण

मुसळधार पाऊस पडला तर मात्र पेरणीविना क्षेत्र पडून राहील, असे चित्र निर्माण झाले आहे. मॉन्सूनच्‍या पावसाचे उशिरा आगमन झाल्‍याने तीन आठवडे खरीप हंगामातील पेरण्या उशिरा आणि आता पेरणीसाठी आवश्यक उघडीप मिळत नसल्याने बळीराजाला पेरण्या पूर्ण कशा होतील? याची काळजी लागून राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam low water level news
Satara and Sangli Face Water Crisis as Koyna Power Generation Set to Halt
Stormy Winds Turn Fatal at Koyna Reservoir; Boat Driver Loses Life in Mishap
Deputy CM Eknath Shinde reviewing water conservation efforts under the ‘Gal Mukt Dharan, Jal Yukt Shivar’ scheme.
Marathi News Esakal
www.esakal.com