Vehicles with caste stickers 
देश

जातीचे स्टिकर्स लावून मिरवणारी वाहने सील करण्याचे आदेश

migrator

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये आता वाहनांवरील जातीवाद  चांगलाच महागात पडणार आहे. ज्या वाहनांवर जातीवाचक शब्द लिहिले असतील ती वाहने जप्त करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील शिक्षक हर्षल प्रभु यांच्या पत्रानंतर उत्तर प्रदेशमधील अघोऱ्या प्रकाराला चाप बसणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये धावणाऱ्या वाहनांवरील जातीवाद सामाजासाठी घातक आहे, असे हर्षल प्रभू यांनी म्हटले होते. 

HT च्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमध्ये कार-बाइक, बस-ट्रक यावरच नाही तर ट्रॅक्टर आणि  रिक्षा यासारख्या वाहनांवर 'ब्राह्मण', 'क्षत्रिय', 'जाट', 'यादव', 'मुगल', 'कुरेशी' लिहिलेले आढळते. मुंबई उपनगरातील कल्याणला राहणाऱ्या आणि पेशाने शिक्षक असलेल्या हर्षल प्रभू यांनी यासंदर्भात थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. वाहनांवर जातीचा उल्लेख करणे काही लोकांना अभिमानास्पद वाटते. मात्र ही बाब समजाला नुकसान पोहचवणारी आहे, असा उल्लेख हर्षल प्रभू यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केला होता. एवढेच नाही तर वाहनांवर अशा प्रकारे लिहिणे कायद्यात बसत नाही, असेही त्यांनी म्हटले होते. 

या प्रकाराची पंतप्रधान कार्यालयात तक्रार दाखल झाल्यानंतर अप्पर परिवहन आयुक्त मुकेश चंद्र यांनी अशा वाहनांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जातीचा उल्लेख नंबर प्लेटवर केलेला असो किंवा वाहनाच्या कोणत्याही भागावर केलेला असेल तर अशी वाहने जप्त करा, असे आदेश सर्व आरटीओ कार्यालयाला देण्यात आले आहेत. 
परिवहन विभागाने यासंदर्भात आदेश काढला आहे. नंबर प्लेट अथवा वाहनावर प्रकारे जातीचा उल्लेख करु नये. या नियमाचे उल्लंघन केल्यास वाहने जप्त करण्यात येतील, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रत्येक 20 वाहनामागे एका वाहनावर अशा प्रकारे जात लिहिल्याचे आढळते, असेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT