Prashant Nair 
देश

Who Is Captain Prashant Nair : कोण आहेत ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर? ज्यांच्या नेतृत्वात अंतराळात जाणार 'गगनयान मिशन'

Gaganyaan Mission Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार (२७ फेब्रुवारी) रोजी तिरुअनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथून गगनयान मिशन अंतर्गत अंतराळात जाणार आहेत त्या ४ अंतराळवीरांची नावे जाहीर केली.

रोहित कणसे

Gaganyaan Mission Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार (२७ फेब्रुवारी) रोजी तिरुअनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथून गगनयान मिशन अंतर्गत अंतराळात जाणार आहेत त्या ४ अंतराळवीरांची नावे जाहीर केली. यावेळी पंतप्रधानांनी या सर्वांची भेटही घेतली. पीएम मोदींनी जाहीर केलेल्या नावांमध्ये शुभांशु शुक्ला, अंगद प्रताप, प्रशांत नायर आणि अजित कृष्णन यांचा समावेश आहे.

PM मोदींनी अंतराळवीरांना विंग्ज घालू जगासमोर सादर केले. यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत नायर हे केरळचे रहिवासी आहेत. त्यांना रशियामध्ये मानवी अंतराळ मोहिमेसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. ते मूळचे केरळ राज्यातील पलक्कडच्या नेनमारा येथील आहेत आणि हवाई दलात ग्रुप कॅप्टन म्हणून कार्यरत आहे.

कोण आहेत प्रशांत नायर? (Astronaut Prashanth Nair)

मल्याळम डेली मातृभूमीने दिलेल्या रिपोर्टनुसार, त्यांनी नॅशनल डिफेंस अकॅडमीमधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी अलबामा येथील यूएस एअर कमांड अँड स्टाफ कॉलेजमधून फस्ट रँकसह पदवी प्राप्त केली आणि १९९९ मध्ये एक कमिशन्ड ऑफिसर म्हणून हवाई दलात सामील झाले. ते फायटर पायलट आहेत. रशियामध्ये प्रशिक्षणासोबतच त्यांनी बंगळुरू येथील ह्युमन स्पेसफ्लाइट सेंटरमध्येही प्रशिक्षण घेतले आहे. (Who Is Captain Prashant Nair)

प्रशांत नायर यांची निवड कशी झाली?

इस्रोने या मोहिमेसाठी शेकडो वैमानिकांची चाचणी घेतली होती, त्यापैकी केवळ १२ वैमानिकांची निवड करण्यात आली होती. प्रथम स्तरावरील चाचणी उत्तीर्ण झालेल्या १२ वैमानिकांची इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन (IAM) साठी निवड करण्यात आली. यानंतर चाचणीच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि त्यानंतर इस्रो आणि हवाई दलाने या ४ वैमानिकांची निवड केली आणि त्यात प्रशांत बालकृष्णन नायर यांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस, पाणी सलाईन घेण्यास नकार

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

Miami Airport Plane Crash : ॲमेझॉनचं विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरलं अ्न रस्त्यावर आलं, वाहनांना धडक; ५ जणांचा मृत्यू

पुन्हा पुन्हा तेच चेहरे पाहून कंटाळली तापसी पन्नू? बॉलीवूडच्या कास्टिंगवर तापसी पन्नूची टीका करत म्हणाली, 'रोमँटिक कॉमेडीत तेच...'

SCROLL FOR NEXT