Gaganyaan Mission: गगनयान मिशनसाठी निवडलेल्या अंतराळवीरांची नावे आली समोर; पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

India first manned space mission Gaganyaan: अवकाशात माणसाला पाठवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. भारतीय संशोधन संस्था इस्त्रो (ISRO) यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहे.
 mission Gaganyaan:
mission Gaganyaan:

Gaganyaan Mission: अंतराळात माणसाला पाठवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. भारतीय संशोधन संस्था इस्त्रो (ISRO) यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहे. माणसाला अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेत आपण एक-एक पाऊल पुढे टाकत आहोत. नुकतंच इस्त्रोने यासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. अवकाशात पाठवल्या जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे समोर आली आहेत. (names of the prospective astronauts for India first manned space mission Gaganyaan have been revealed)

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गगनयान मिशनमधील अंतराळवीरांची बंगळुरुतील विक्रम साराभाई स्पेश स्टेशन येथे जाऊन भेट घेतली. ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अजित क्रिष्णन, ग्रुप कॅप्टन अंगत प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला असे अंतराळवीरांची नावे आहेत.

 mission Gaganyaan:
ISRO Mangalyaan 2 : 'मंगळयान-2' मोहीम असणार अगदी अनोखी; लँडर-रोव्हरसोबत ड्रोनही पाठवणार इस्रो? रिपोर्टमध्ये दावा

चारही जण विंग कमांडर्स किंवा ग्रुप कॅप्टन असल्याचं सांगितलं जातंय. चारही अंतराळवीरांना बेंगळुरुतील संस्थेमध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे. गगनयान मिशन हा भारताचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. भारताने जर हे मिशन यशस्वी केले तर अंतराळात व्यक्तीला पाठवणारा भारत चौथा देश ठरेल.

निवड प्रक्रियेतून चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. यासाठी इस्रोकडून ट्रेनिंग प्रोग्रॅम देण्यात आला होता. २०२१ मध्ये त्यांची ट्रेनिंग संपली. कोरोना महामारी आल्यामुळे ट्रेनिंगसाठी जास्त वेळ लागल्याचं सांगितलं जातं. चार अंतराळवीरांना ट्रनिंगसाठी रशियामध्ये देखील पाठवण्यात आलं होतं, अशी माहिती आहे.

 mission Gaganyaan:
ISRO INSAT-3DS : इस्रो लाँच करणार देशातील सगळ्यात आधुनिक हवामान आणि डिझॅस्टर वॉर्निंग सॅटेलाईट! तयारी झाली पूर्ण

मागील आठवड्यात इस्रोने महत्त्वाची माहिती दिली होती. क्रायोजैनिक इंजिन टेस्टिग पूर्ण झाल्याचं इस्रोने म्हटलं होतं. हेच इंजिन गगनयानमध्ये वापरले जाणार आहे. गगनयान मिशन भारतासाठी मैलाचा दगड ठरु शकणार आहे. इस्रोकडून हे मिशन यशस्वी होईल असा देशवासियांना विश्वास आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com