Yogi Adityanath Sakal
देश

सामाजिक न्याय नव्हे, हे तर शोषण; योगींची ‘सप’वर टीका

मकर संक्रांतीनिमित्त योगी यांनी दलित नागरिक अमृतलाल भारती यांच्या घरी जाऊन भोजन केले.

सकाळ वृत्तसेवा

गोरखपूर : समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) राजवटीत सामाजिक न्याय नव्हे, तर सामाजिक शोषण चालायचे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केली. मकर संक्रांतीनिमित्त योगी यांनी दलित नागरिक अमृतलाल भारती यांच्या घरी जाऊन भोजन केले. स्वामीप्रसाद मौर्य, दारासिंग चौहान, धरमसिंह सैनी हे लखनौमधील कार्यक्रमात सपामध्ये प्रवेश करण्यास थोडा वेळ बाकी असताना हा कार्यक्रम झाला. (Uttarpradesh Political News)

असे टायमिंग साधल्यानंतर योगी म्हणाले की, भाजप सरकार कोणताही भेदभाव न करता समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या विकासासाठी कार्य करीत आहे. घराणेशाहीच्या राजकारणात गर्क असलेले कोणत्याही वर्गाला न्याय देऊ शकत नाहीत. सपा सरकारने दलित आणि गरिबांच्या हक्कावर घाला घातला.

केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारचा डबल इंजिन असा उल्लेख करून त्यामुळे झालेल्या विकासाची माहिती योगी यांनी दिली.

अखिलेश यादव यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत लोकांना केवळ १८ हजार घरे मिळाली. तर, आम्ही या योजनेनुसार ४५ लाख गरीब आणि वंचितांना निवारा दिला. आम्ही दोन कोटी ६१ लाख स्वच्छतागृहे बांधली. एक कोटी ३६ लाख कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ झाला.

- योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway route villages : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांची यादी आली, असा आहे मार्ग

Maharashtra Education DA Arrears: शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ महागाई भत्ता थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासह देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

Mumbai News : कुलगुरूंच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डीबाटू विद्यापीठाचे २०२५ मधील हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर

Gadchiroli Accident : अपघातात दांपत्याचा मृत्यू; सहा वर्षांची चिमुकली झाली पोरकी

SCROLL FOR NEXT