
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय
पुणे : राज्यात येत्या २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम कोरोना संसर्ग वाढीमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. केंद्र सरकारच्या पत्रानुसार ही लसीकरण मोहीम पुढे ढकलण्यात आल्याचे राज्याच्या कुटुंब कल्याण माता बाल संगोपन व शालेय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांना जिल्हा आरोग्य विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
स्थगित करण्यात आलेली ही लसीकरण मोहीम आता २७ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित केली जाणार असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येत्या २३ जानेवारीला पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार होती.
परंतु या तारखेला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करू नये, असे केंद्रीय आरोग्य विभागाने राज्य सरकारला पत्राद्वारे केली आहे. या मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लस दिली जात असते.
Web Title: National Polio Dose Campaign Postponed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..