Nawab Malik News | Satyendra Jain News 
देश

मलिक, जैन यांची राज्यांच्या मंत्रिमंडळांतून हकालपट्टी करा, SC मध्ये याचिका दाखल

'याचिका निबंधकांसमोर सादर केली आहे का, त्यांनी तीही करून न घेतल्यास आमच्यापुढे सादर करा'

सकाळ डिजिटल टीम

'याचिका निबंधकांसमोर सादर केली आहे का, त्यांनी तीही करून न घेतल्यास आमच्यापुढे सादर करा'

नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या देशात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना या दोन्ही नेत्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

संबंधित राज्यांच्या मंत्रिमंडळांतून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका प्रथम सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यापुढे सादर केली जाणार असून त्यानंतर सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. अॅडव्होकेट अश्विनीकुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता यावर कोर्ट कोणता निर्णय देणार पहावे लागणार आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक व दिल्ली मंत्रिमंडळातील मंत्री सत्येंद्र जैन यांना स्वतंत्र गुन्ह्यांखाली ईडीकडून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असून यांची संबंधित राज्यांच्या मंत्रिमंडळांतून हकालपट्टी करण्याचे निर्देश राज्य सरकारांना द्यावेत,' अशी विनंती उपाध्याय यांनी याचिकेत केली आहे.

याचिकेत उपाध्याय म्हटले की, हे दोन्ही मंत्री केवळ लोकसेवक नसून, लोकप्रतिनिधीही आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यास एखाद्या गुन्ह्याखाली दोन दिवस न्यायालयीन कोठडीची शिक्षा झाल्यास त्यांना सेवेतून तात्पुरते निलंबित करण्यात येते. त्यामुळे या दोन मंत्र्यांनाही मंत्रिपदावरून तात्पुरते हटवण्याची गरज आहे.

यावर खंडपीठाने स्पष्ट केले की, तुम्ही ही याचिका निबंधकांसमोर सादर केली आहे का, त्यांनी तीही करून न घेतल्यास आमच्यापुढे सादर करा. ही याचिका सरन्यायाधीशांपुढे सादर केल्यानंतर त्यावर सुनावणी घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता यावर कोणती सुनावणी होणार याकडे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे लक्ष लागले आहे.

काय आहेत दोन्ही नेत्यांची ईडी प्रकरणं ?

नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे. ईडीनं सत्येंद्र जैन यांची यापूर्वी चौकशी केली होती. सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीनं ५ एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची सपत्ती तात्पुरती जप्त केली होती.

नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात मलिकांना न्यायालयीन कोठडीत देण्यात आली आहे. अटकेपूर्वी ईडीने मलिक यांची तब्बल सात तास चौकशी केली होती. 'मलिक हे न्यायालयीन कोठडीत असले तरी कॅबिनेट मंत्री आहेत आणि आपल्या मतदारसंघातील लोककल्याणाच्या प्रश्नांकडे लक्ष देणे त्यांचे कर्तव्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या पन्नाशीत गुन्हा, ३४ वर्षांनी ८४व्या वर्षी दोषी, आज शिक्षेची सुनावणी; आरोपीचा VIDEO VIRAL

माधुरी दीक्षित त्या कृतीमुळे झाली ट्रोल, उत्तर देताना म्हणाली...'कोणाचाही वाईट हेतू नव्हता पण...'

Latest Marathi News Live Update : काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

IND vs AFG, T20I: अफगाणिस्तान पहिल्यांदाच भारताचे आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी यजमानपद भूषवणार! कुठे होणार सामने?

Stock Market Today: इराणच्या निर्णयाचा शेअर बाजाराला फटका! सेन्सेक्स-निफ्टी घसरले, गुंतवणूकदारांनी काय करावे?

SCROLL FOR NEXT