Chandrakant Patil News | राऊत, पवारांना जरा जास्तच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला | Chandrkant Patil on Sharad Pawar & Sanjay Raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrkant Patil on Sharad Pawar & Sanjay Raut

सध्या राज्यात जे सत्तापरिवर्तन सुरु आहे त्याबद्दल काही माहिती नाही - चंद्रकांत पाटील

राऊत, पवारांना जरा जास्तच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे : चंद्रकांत पाटील

सध्या राज्यात जे सत्तापरिवर्तन सुरु आहे त्याबद्दल काही माहिती नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीमागे काही विशेष कारण नाही. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागेही भाजपचा हात नाही, असं स्पष्टीकरण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. (maharashtra politics) आज ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. या दोन्ही नेत्यांना जरा जास्तच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असा टोमणा त्यांनी मारला आहे.(Chandrkant Patil on Sharad Pawar)

यावेळी बोलताना त्यांनी भाजपाची अधिकृत भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, भाजपाची भूमिका महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो. मात्र भाजपच्या सर्व नेत्यांना उत्तर देण्याचे अधिकार आहेत. राज्यातील सत्तापरिर्तानाशी मी अनभिज्ञ आहे, त्यामुळे कोण आमदार गेलेत, किती गेलेत, कोण माघारी येणार आहेत, कोणाला आनंद होणार आहे, हे काही मला माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. (Chandrkant Patil on Sanjay Raut)

हेही वाचा: त्यांचा माज वाढलाय, मोदींनीच याचं उत्तर द्यावं, राऊत भडकले

सत्ताबदल होणार हे तुम्हालाही माहिती आहे, यावर प्रश्नावर ते म्हणाले की, सुरु असलेल्या राज्यातील घटनांशी काहीही संबंध नाही. सत्ताधारी गटातील राज्यकर्ते काय बोलतात हे माध्यमांकडून समजत आहे. मोहित कंबोज हे आमचे चांगले मित्र आहेत. त्याप्रमाणे ते एकनाथ शिंदेंचाही तो मित्र असेल त्यामुळे त्यांनी गुवाहाटी शिंदेंनी त्यांना बोलावून घेतले असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: राज्यातल्या सत्तापरिवर्तनाबद्दल मला माहित नाही - चंद्रकांत पाटील

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का? यावर प्रदेशाध्यक्ष म्हणाले, संजय राऊत यांना सकाळी जे म्हणायंच ते सांयकाळी म्हणतील याची शाश्वती नाही. त्यामुळ त्यांना काय म्हणायचं ते मी सांगू शकत नाही. यासंदर्भात असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आला तर यावर चर्चा करु, असंही ते म्हणाले आहेत.

Web Title: Chandrakant Patil Says Bjp Do Not Interfere In Eknath Shinde Revolt From Shivsena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top