10th 12th Examination esakal
एज्युकेशन जॉब्स

Board Exam : दहावी-बारावी परीक्षांबाबत शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, 'या' पद्धतीनं घेतली जाणार परीक्षा

दहावी, बारावी परीक्षांबाबत शिक्षण मंडळाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दहावी, बारावी परीक्षांबाबत शिक्षण मंडळाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत (10th 12th Exam) शिक्षण मंडळाकडून (Education Board) महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा जुन्या पद्धतीनंच घेतल्या जाणार आहेत, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय.

कोरोनाच्या काळात (Coronavirus) विद्यार्थ्यांना काही सूट देण्यात आल्या होत्या. यामध्ये शाळा तिथं परीक्षा केंद्र, वाढीव वेळ, अभ्यासक्रमामधील कपात याचा समावेश होता. मात्र, यंदा या सवलती रद्द करण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्यानं या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. यंदाची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल, तर राज्य मंडळाच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, परीक्षेच्या दरम्यान अतिरिक्त वेळही दिला जाणार नाही, असा निर्णयही शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT