एज्युकेशन जॉब्स

Career Guidance: हे कॉम्प्युटर कोर्स केले तर तुमचे करिअर होईल सेट, मिळेल लाखोंचे पॅकेज

अनेक कोर्सेस चांगले तर असतात पण त्याबद्दल विद्यार्थ्यांना हवं तसं मार्गदर्शन मिळत नाही.

Aishwarya Musale

आजचे युग कॉम्प्युटचे आहे. घरापासून ऑफिसपर्यंत सर्व कामे कॉम्प्युटरच्या माध्यमातून होत आहेत. अशा परिस्थितीत कॉम्प्युटर क्षेत्रातील करिअरबद्दल बोलायचे झाले तर मग ती सरकारी नोकरी असो वा खासगी, कॉम्प्युटरचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरीकडे, जर आपण कॉम्प्युटर कोर्सबद्दल बोललो, तर चांगल्या नोकरीबरोबरच पगार देखील उत्कृष्ट असते.

व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन कोर्स: तुमच्याकडे क्रिएटिव्हीटी असेल आणि कॉम्प्युटर शिकण्याची इच्छा असेल, तर व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन हा एक चांगला कोर्स असू शकतो. आजच्या काळात अॅनिमेशन प्रोफेशनल्स आणि आर्टिस्टला खूप मागणी आहे. आजकाल चित्रपटही अॅनिमेशन बनवले जात आहेत. जिथे चित्रपट उद्योगात अॅनिमेशन आर्टिस्ट आणि प्रोफेशनल्स यांना खूप मागणी आहे. या कोर्सनंतर चित्रपटसृष्टीत सहज नोकरी मिळू शकते.

कोर्स: शॉर्ट टर्म कोर्स 5 महिन्यांचा आहे तर डिप्लोमा 3 वर्षांचा आहे.

वेब डिझायनिंग : नोकरीच्या दृष्टीने हा सर्वोत्तम कोर्स मानला जातो. हे केल्यानंतर, तुम्हाला मल्टीनेशनल कंपन्यांमध्ये थेट ऑफर मिळू शकतात. बाजारात वेब डिझायनर्सना खूप मागणी आहे. या कोर्समध्ये JavaScript, PHP, HTML इत्यादी कोडिंग भाषांचा अभ्यास समाविष्ट आहे.

कोर्स: वेब डिझायनिंग कोर्सचा कालावधी 1 वर्षाचा आहे ज्यामध्ये शॉर्ट टर्म 3 ते 6 महिने आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचे काम सुरू करू शकता किंवा कोणत्याही कंपनीत काम करू शकता.

टॅली कोर्स : टॅली तज्ज्ञांच्या डिमांडमुळे टॅली कोर्सलाही मोठी मागणी आहे. हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही संस्थेतून शिकण्याव्यतिरिक्त, तुम्ही ते ऑनलाइन देखील शिकू शकता.

कोर्स : या कोर्स चा कालावधी ३ ते ४ महिन्यांचा आहे.

डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स: यामध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स आणि प्रोग्रामिंग यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अनेक नामांकित महाविद्यालये आणि संस्था हा कॉम्प्युटर सायन्स कोर्स देतात. हे केल्यानंतर तुम्हाला नोकरीचे चांगले पॅकेजही मिळू शकते.

IT डिप्लोमा: IT डिप्लोमा हा 12वी नंतरचा सर्वोत्तम कॉम्प्युटर कोर्स आहे. हा कोर्स यूजफुल आणि व्हॅल्यूएबल असून त्याचा कालावधीही मोठा आहे. आपले करिअर योग्य दिशेने घेऊन आपण कॉम्प्युटर क्षेत्रात मास्टर बनू शकता.

कोर्स : या कोर्सचा कालावधी ३ वर्षांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT