Career Tips
Career Tips esakal

Career Tips : अल्पावधीत करिअरला कलाटणी द्यायची आहे? मग, फॉलो करा ‘या’ टिप्स

करिअरच्या सुरूवातीचा काळ वेगळा असतो आणि करिअरमध्ये स्थिर झाल्यानंतरचा काळ वेगळा असतो.

Career Tips : बदल हा निसर्गाचा नियम आहे, असे नेहमी म्हटले जाते. कोणत्याही गोष्टीमध्ये काही काळानंतर बदल होतात. मग, ते माणसाचे आयुष्य असो किंवा पर्यावरण असो. ठराविक वेळेनंतर त्यात बदल होतातच.

करिअरचे ही अगदी तसेच आहे. वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये ही सतत बदल होत असतात. करिअरच्या सुरूवातीचा काळ वेगळा असतो आणि करिअरमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतरचा टप्पा हा वेगळा असतो. त्यात बदल झालेला असतो.

करिअरमध्ये बदल घडवण्यासाठी नेहमीच प्रत्येक जण झटत असतो. अल्पावधीमध्ये तुम्ही देखील तुमच्या करिअरमध्ये बदल घडवू शकता आणि तुमच्या करिअरला कलाटणी देऊ शकता. त्यासाठी खास आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.

Career Tips
Career Tips : करिअर स्विच करतायं? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

वेळेचे महत्व लक्षात घ्या

करिअर करत असताना तुम्ही त्यात शिस्त पाळणे महत्वाचे आहे. यातून तुमची कामाप्रतीची निष्ठा दिसून येत असते. त्यामुळे, काम करत असताना वेळेचे महत्व नेहमी लक्षात घ्या.

प्रत्येक कामाची आणि कामावर वेळेपूर्वी येण्याची वेळ पाळल्यानंतर याचे फायदे तुम्हाला नक्कीच दिसून येतील. तुम्ही वेळेप्रती शिस्तबद्ध असाल तर, तुम्हाला काम करायला पुरेसा वेळ आणि संधी मिळू शकेल.

गुरूचा शोध घ्या

आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर तुम्हाला गुरूचे मार्गदर्शन घेणे महत्वचे आहे. करिअरचे ही अगदी तसेच आहे. तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला बरेच काही शिकायला मिळते.

त्यांच्याकडून वारंवार मार्गदर्शन घेत रहा. नव्या गोष्टी शिकत रहा, काही चुकले तर त्यांना विचारा आणि त्यांचा सल्ला घ्या. याचा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नक्कीच फायदा मिळेल.

तुमची ओळख बनवा

करिअरमध्ये नवे बदल घडवण्यासाठी आणि करिअरला कलाटणी मिळवून देण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल, यात काही शंका नाही. यासाठी तुमच्या कामाप्रती निष्ठा बाळगा आणि नेहमी सक्रिय रहा.

यासोबतच, तुमचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर रहा. नियमित सराव आणि प्रचंड मेहनतीमुळे तुमची ऑफिसमध्ये वेगळी ओळख तयार होईल. त्यामुळे, अल्पावधीतच, तुमच्या करिअरला कलाटणी मिळण्यास मदत होईल.

Career Tips
Career Planning Tips : करिअर प्लॅनिंग करताय? मग ‘या’ टिप्सची घ्या मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com