School Uniform Skirt esakal
एज्युकेशन जॉब्स

School Uniform : मुलींच्या शालेय गणवेशात होणार मोठा बदल; आयोगाची शिक्षण विभागाकडे शिफारस

मुलींना (School Girls) स्कर्ट घालण्यास अनेकदा लाज वाटते, असे नमूद करून त्यांनी त्यांचा गणवेश बदलून चुडीदार किंवा पँट घालण्याची सूचना केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

खेळताना स्कर्ट घालताना विद्यार्थिनींना लाज वाटते आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. शाळेत जाताना चुडीदार किंवा पँट घातल्यास सायकलिंगही करता येते.

बंगळूर : कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (Karnataka State Commission for Protection of Child Rights KSCPCR) मुलींच्या शालेय गणवेशात स्कर्टवरून चुडीदार किंवा पँट (पायघोळ) असा बदल करण्याची शिफारस राज्याच्या शिक्षण विभागाला केली आहे.

गुलबर्गा येथील महिला व बालकल्याण विभागाच्या सहायक संचालक यांनी स्कर्ट (School Uniform Skirt) परिधान करणाऱ्या मुलींना होणाऱ्या गैरसोयीबाबत आयोगाला पत्र लिहिल्यानंतर ही शिफारस केली आहे. पत्रात म्हटले, 'की मुली लाजाळू असतात. प्रवास करताना गर्दीच्या ठिकाणी फिरताना, सायकल चालवताना किंवा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होताना स्कर्ट घालणे अडचणीचे ठरते. लैंगिक छळाच्या बातम्या आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुलींना (School Girls) स्कर्ट घालण्यास अनेकदा लाज वाटते, असे नमूद करून त्यांनी त्यांचा गणवेश बदलून चुडीदार किंवा पँट घालण्याची सूचना केली आहे. १७ मे रोजी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या आयुक्तांना पत्र लिहून महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या शिफारशीवर प्रकाश टाकला. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले आहे.

खेळताना स्कर्ट घालताना विद्यार्थिनींना लाज वाटते आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. शाळेत जाताना चुडीदार किंवा पँट घातल्यास सायकलिंगही करता येते. गणवेश बदलल्यास मुलींच्या मनातील चिंता दूर होतील.

-के. नागन्ना गौडा, अध्यक्ष, कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! आयात शुल्क वाढीनंतर आज सर्वात कमी दर; उच्चांकापासून तब्बल 23 हजारांनी स्वस्त; पाहा ताजे भाव

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Sugarcane farmers: नेत्यांच्या साखरसाम्राज्यात अडकले शेतकऱ्यांच्या घामाचे २१८ कोटी; सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटींची थकबाकी

Firefly Festival: काजवा महोत्सवाची परदेशी पर्यटकांना भुरळ; जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील निसर्गप्रेमी अकोल्यात

Rajat Patidar: ट्रॉफी जिंकताच कॅप्टन रजत पाटीदारचा मोठा खुलासा, हे सगळं आधीच ठरलेलं होतं' म्हणत नेमकं काय बोलून गेला? पाहा..."

SCROLL FOR NEXT