career options and job  Sakal
एज्युकेशन जॉब्स

JOB : रोजगाराच्या बाबतीत टॉप-10 कंपन्यांपैकी 5 कंपन्या भारतीय, जगात वाजतोय डंका

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी असे स्वप्न असते.

सकाळ डिजिटल टीम

Top Companies For Job In India : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी असे स्वप्न असते, यासाठी अनेक जण प्रयत्नदेखील करत असतात. काहींना यामध्ये यश मिळते तर, काहींचा हिरमोड होतो. मात्र, भारतात नोकरीसाठी सर्वाधिक लोकांना आकर्षित करणाऱ्या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनी आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. तर, मर्सिडीज-बेंझ दुसऱ्या आणि अॅमेझॉन इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप 10 कंपन्यांच्या यादीमध्ये 5 कंपन्या या देशांतर्गत आहेत. रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्चने (REBR) 2022 जारी केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

REBR ने जारी केलेल्या अहवालानुसार, टॉप 10 मध्ये टाटा समूहाच्या तीन कंपन्या असून, यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सातव्या, टाटा स्टील आठव्या आणि टाटा पॉवर नवव्या स्थानावर आहे. तर, सॅमसंग दहाव्या क्रमांकावर आहे. या कंपन्यांची आर्थिक स्थिती, प्रतिष्ठा आणि आकर्षक पगार आणि इतर सुविधांनुसार निवड करण्यात आली आहे.

24 टक्के कर्मचाऱ्यांनी बदलल्या नोकऱ्या

सर्वेक्षणानुसार, 2021 च्या शेवटच्या सहामाहीत भारतातील सुमारे 24 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलल्याचे नमुद करण्यात आले आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत सर्वेक्षण केलेल्या तीनपैकी एका कर्मचाऱ्याने (37 टक्के) सांगितले की, त्यांना 2022 च्या पहिल्या सहामाहीत नोकऱ्या बदलायच्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SA: बाबर आझमला फॉर्म सापडेना! टोनी डी झोर्झीने एका हाताने अफलातून कॅच घेत धाडलं माघारी, पाहा Video

Rahul Gandhi preparing sweets Video : राहुल गांधींनी तळली इमरती अन् बनवले बेसनाचे लाडू ; दुकानदार म्हणाला ‘’आता फक्त..’’

Bacchu Kaduचं वादग्रस्त विधान, Dattatray Bharne बघा काय म्हणाले? | Sakal News

'जयाने जर पांढरी साडी घातली...', अमिताभ बच्चन यांच्या आई निर्मात्याला म्हणाल्या.... 'तुझं जगणं...'

Diwali Offer : १०० रुपयांचा रिचार्ज करा अन् Silver Coin जिंका, 'या कंपनीची भन्नाट ऑफर, आज शेवटचा दिवस...

SCROLL FOR NEXT