
Truth or Dare च्या नावाखाली विद्यार्थ्यांचे चाळे; व्हिडीओ व्हायरल
ट्रूथ एँड डेअर हा गेम खेळतानाचा काही ११ वी-१२ वीच्या विद्यार्थ्यांच्या व्हिडीओ सध्या जोरात व्हायरल होतोय. या व्हिडीओत हे दोघे फ्रेंच किस करताना दिसत आहे. या २० सेकंदाच्या व्हिडीओमुळे तीन मुलींसह ११ विद्यार्थ्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र या प्रकारात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे.
ज्या मुलाने हा व्हिडीओ शूट केलाय, त्या मुलाने पोलिसांना सांगितलं की, या ट्रूथ एँड डेअर खेळादरम्यान, गृपमधल्या एका मुलीवर गृपमधल्याच मुलांनी लैंगिक अत्याचार केले आहे. जानेवारीमध्ये कर्नाटकातल्या मंगलूरुमध्ये ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. या गृपमधल्याच एका मुलाने हा व्हिडीओ शूट केला आणि काही दिवसांपूर्वी तो व्हॉटसपवर शेअर केला. त्या मुलाने माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
व्हिडीओ शूट करणाऱ्या या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. त्या मुलाने सांगितलं की, त्याचे ११ मित्र त्यांच्याच वर्गातल्या दोन मुलांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर ट्रूथ एँड डेअर खेळत होते. या वेळी काही मुलांनी गृपमधल्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांना शंका आहे की द्वेषामुळे या मुलाने व्हिडीओ व्हायरल केलाय. पोलिसांनी या फ्लॅटच्या मालकाकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की, या दोन्ही मुलांना दोन महिन्यांपूर्वीच तिथून हाकलण्यात आलं आहे. घरात दारुच्या बाटल्या सापडल्यानंतर त्यांच्या पालकांना माहिती देऊन या दोघांना घरातून बाहेर काढल्याचं घरमालकांनी सांगितलं.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कॉलेज प्रशासनानेच पोलिसांना याविषयीची माहिती दिली आणि या विद्यार्थ्यांवर कारवाई केली. मात्र अद्याप कोणीही पुढाकार घेतला नसल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. या विद्यार्थ्यांनी ड्रग्ज घेतले होते का, याविषयीची चौकशी सुरू आहे.