Online-Admission
Online-Admission sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune University : कला आणि वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची सुवर्णसंधी

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त आणि दुरस्थ अध्ययन प्रशाळेअंतर्गत सुरु असलेल्या प्रथम वर्ष बी. ए. आणि बी. कॉम या अभ्यासक्रमास इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता यावा, यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच विद्यापीठातर्फे पदवी उत्तीर्ण झालेले आणि नोकरी, व्यवसाय करत असल्याने नियमितपणे महाविद्यालयामध्ये जाऊन पुढील अभ्यासक्रम करणे शक्य होत नाही. अशा पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीप्रमाणे एम. ए. आणि एम. कॉम या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यामुळे कला आणि वाणिज्य शाखेत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी दिली.

विद्यापीठाच्या www.unipune.ac.in/sol या संकेतस्थळावर बी. ए/बी. कॉम आणि एम. ए./ एम. कॉम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत नावनोंदणी करून प्रवेश घेता येणार आहे.

नावनोंदणी केल्यानंतर वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर प्रवेश शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेश अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित अभ्यास केंद्रावर जमा करणे बंधनकारक आहे, असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Results: नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरुंच्या विक्रमाची बरोबरी करणार? ठरणार दुसरे पंतप्रधान?

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

India Lok Sabha Election Results Live : इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार; तेजस्वी यादव यांना विश्वास

Lok Sabha Election Result 2024 : आठ हजार जणांचे भवितव्य आज ठरणार

National Cheese Day 2024: राष्ट्रीय चीज दिवस का साजरा केला जातो, जाणून महत्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT