Shivaji University esakal
एज्युकेशन जॉब्स

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित; व्यवस्थापनाचा मोठा निर्णय

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूय.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूय.

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur), सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूय. कोयना, राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजारा, गगनबावडा परिसरात पावसानं थैमान घातलंय. परिणामी, राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होऊ लागली असून धरण १०० टक्के भरलं असल्यानं धरणाचे स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास गेट क्रमांक 6 उघडले असून यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये सुरूय.

यामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीची वाटचाल धोका पातळीकडं होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालं असून खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठांनं (Shivaji University) देखील मोठा निर्णय घेतलाय. कोल्हापूर, सांगली आणि सातारा (Sangli and Satara) या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळं शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक १० व ११ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालकांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT