Udayanraje Bhosale esakal
एज्युकेशन जॉब्स

उदयनराजे आरोग्यमंत्र्यांना भेटताच, आयोगाची मान्यता

उमेश बांबरे

सातारा : साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Satara Medical College) या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेस राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी १०० जागांची जादा संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Health Minister Mansukh Mandaviya) यांची आम्ही भेट घेतली होती. आता १२ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या नीट परीक्षेतील मेरीटनुसार साताऱ्यात प्रवेश दिले जातील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व श्रेय प्रत्येक सातारकरांचे आहे. त्यामुळे महाविद्यालय सुरू झाल्यावर साताऱ्याच्या विकासात आमूलाग्र बदल होणार असून, याचा सकारात्मक परिणाम सर्वच क्षेत्रात दिसेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केला आहे.

प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची उदयनराजेंनी भेट घेतली होती.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात खासदार भोसले यांनी म्हटले, की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होण्यासाठी किमान ५०० खाटांचे हॉस्पिटल आवश्यक होते. सदरची अट पूर्ण करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये १०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करून घेतल्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्‍न सोडवण्यात आला. गेल्या वर्षीच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते.

मात्र, अनेक टप्पे पार करण्याच्या क्लिस्ट प्रक्रियेमुळे आणि काही वेळा मूलभूत प्रश्‍न अधांतरी राहिल्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया गतवर्षी होऊ शकली नाही. याची खंत वाटते. आता २०२१-२०२२ ची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास आम्ही तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि विद्यमान आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. हे महाविद्यालय सुरू होण्यासाठी अनेकांचा हातभार लागल्याने आज राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या वर्षीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मंजुरी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यावर सातारा शहराबरोबरच जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. सर्व क्षेत्रात रोजगार, उलाढाल यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. शासकीय महाविद्यालय सुरू झाल्याने सातारा शहरात आमूलाग्र बदल घडेल.

-उदयनराजे भोसले, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT