Exams Google
एज्युकेशन जॉब्स

दहावी, बारावी अनुत्तीर्णांची 'परीक्षा'; संभाव्‍य तारखा जाहीर

अरुण मलाणी

नाशिक : कोरोना महामारीच्‍या दुसऱ्या लाटेमुळे यंदा दहावी, बारावीच्‍या लेखी परीक्षा होऊ न शकल्‍याने मूल्‍यांकनाच्‍या आधारे निकाल जाहीर केला होता. तरीदेखील काही विद्यार्थी या मूल्‍यांकन पद्धतीनुसार अनुत्तीर्ण ठरविले गेले. अशा विद्यार्थ्यांची मात्र आता पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षण मंडळातर्फे संभाव्य तारखा जाहीर केल्‍या असून, सप्‍टेंबर-ऑक्‍टोबर महिन्‍यात या परीक्षा घेण्याचे नियोजित आहे.

लेखी परीक्षेअभावी मूल्‍यमापन पद्धतीनुसार बहुतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यामुळे यंदाच्‍या वर्षाचा निकाल उच्चांकी लागला होता. असे असतांना एक टक्‍यांहून कमी विद्यार्थी मात्र मूल्‍यमापन पद्धतीनंतरही उत्तीर्ण होऊ शकले नव्‍हते. या विद्यार्थ्यांना आता उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेचा सामना करावा लागणार आहे. नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळावी, याकरीता नियमित शैक्षणिक वर्षात जुलै-ऑगस्‍टमध्ये परीक्षा घेतली जात असते. परंतु यंदा निकालात विलंब झाल्‍यानंतर नुकताच शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षेच्‍या तारखांची घोषणा केली आहे.

१५ सप्‍टेंबरपासून परीक्षा

लेखी परीक्षेपूर्वी दहावी, बारावीच्‍या प्रात्‍येक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा पार पडणार आहेत. इयत्ता बारावीच्‍या परीक्षा १५ सप्‍टेंबर ते ४ ऑक्‍टोबर दरम्‍यान होतील तर दहावीच्या परीक्षा २१ सप्‍टेंबर ते ४ ऑक्‍टोबर दरम्‍यान घेतल्‍या जाणार आहेत.

लेखी परीक्षा १६ सप्‍टेंबरपासून

प्रात्‍येक्षिक परीक्षा झाल्‍यानंतर लगेचच लेखी परीक्षांना सुरवात होणार आहे. त्‍यानुसार बारावीची (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय-जूना व पुनर्रचित अभ्यासक्रम) परीक्षा १६ सप्‍टेंबर ते ११ ऑक्‍टोबर दरम्‍यान होईल. तर बारावीची व्‍यवसाय अभ्यासक्रम (जूना व पुनर्रचित अभ्यासक्रम) परीक्षा १६ सप्‍टेंबर ते ८ ऑक्‍टोबर या कालावधीत पार पडणार आहे. दहावीची परीक्षा २२ सप्‍टेंबर ते ८ ऑक्‍टोबर या कालावधीत घेण्याचे नियोजित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: जोरदार पावसातही लोकल सुसाट धावणार, रेल्वेचा खोळंबा टळणार; प्रशासनाने उचलले मोठे पाऊल

बाबो! बॉबी देओल एकावेळी प्यायचा २० ग्लास दूध, सनी देओलच्या आहाराबद्दल म्हणाला, 'त्याला लस्सी किंवा दूध...'

TVS Bike : फक्त 47 हजार किंमत; 30 दिवसांत 42,246 लोकांनी खरेदी केली 'ही' टू व्हीलर गाडी, 58 कि.मी. स्पीड

काम तर करायची नाहीच उलट... सुप्रिया पाठारेंना कामवालीचा आलेला असा अनुभव की त्यांनी हातच जोडले; म्हणाल्या-

Latest Marathi News Update : आजपासून मुंबई टी२० लीगला सुरूवात; वानखेडे स्टेडियमवर रंगणार ३० सामने

SCROLL FOR NEXT