नाशिक : भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी अखेर शिवसैनिकांना जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी अखेर

नाशिक : भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी अखेर शिवसैनिकांना जामीन

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यालयावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्याना जामीन मंजूर झाला आहे. पंधरा हजाराच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर त्यांना जामीन घेऊन सोडण्यात आले.नगरसेवक दीपक दातीर (३१, रा. नवनाथनगर, दातीर मळा, अंबड), नितीन सामोरे (३५, स्वामी नगर, अंबड), योगेश चुंबळे (३४, रा. गौळाणे, ता. नाशिक), नगरसेविकेचे पती योगेश उर्फ बाळा दराडे (३३, रा. अश्विननगर, सिडको) आणि किशोर साळवे (२४, रा. नवनाथ नगर, अंबड) यांना नाशिक पोलिसांच्या गुन्हे शोध विभागाने अटक केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द काढल्याने त्यावरुन राणे यांच्या विरोधात नाशिक शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर दीपक दातीर, बाळा दराडे यांच्यासह अन्य काही शिवसैनिकांनी भाजपाच्या एनडी पटेल रोडवरील कार्यालयावर दगडफेक केली. गुन्हा घडल्यानंतर हे संशयित थेट मुंबईला रवाना झाले. संबंधित संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी करीत पोलिस आणि शिवसेनेने कट करून केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करणे व इतर बाबी केल्याचा आरोप भाजपने केला होता.

हेही वाचा: नाशिक : कुलंग किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची ७ तासांनंतर सुटकामंगळवारी (ता.२४) ला कार्यालयावर हल्ला झाल्यापासून हल्लेखोर संशयित पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे शहर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. शुक्रवारी सकाळी शिवसेना नेते संजय राऊत वृत्तवाहिन्यांना मुलाखत देत असताना दातीर आणि दराडे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपाने पोलिसांवर आगपाखड केली. त्यानंतर दोघे शिवसैनिक नाशिकमध्ये दाखल झाले. राजकीय दृष्टीकोनातून हे प्रकरण संवेदनशील बनत असल्याने पोलिसांनी शनिवारी सकाळी वरील सर्वांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास सेंट्रल युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे करीत असून, संशयितांना आज सोमवारी (ता.३०) कोर्टात हजर करण्यात आल्यावर त्यांना वैयक्तीक जामीनावर सोडण्यात आले.

हेही वाचा: नाशिक : मंदिरे उघडण्यासाठी रामकुंडावर शंखनाद

loading image
go to top