एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा Sakal
एज्युकेशन जॉब्स

Exams: एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होईल

मीनाक्षी गुरव

पुणे : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील इयत्ता नववीमधील विद्यार्थ्यांकरिता एलिमेंटरी चित्रकला श्रेणी परीक्षा, तसेच इयत्ता दहावी व मुलभूत/कला शिक्षक प्रशिक्षण पदविका (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा ९ ते १२ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होईल, अशी माहिती कला संचालनालयाचे कला संचालक राजीव मिश्रा यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षेचे सवलतीचे गुण मिळणार नसल्यामुळे आता ही नववीत असणाऱ्या या विद्यार्थ्यांकरिता एलिमेंटरी परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी, परीक्षा शुल्क; तसेच परीक्षक, समालोचक, उपमुख्य समालोचक यांच्या अर्जाची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने ‘https://dge.doamh.in’ या संकेतस्थळावर करायची असून परीक्षेबाबत अधिक माहिती या संकेतस्थळवर उपलब्ध आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळावा, यासाठी इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल एलिमेंटरी परीक्षेच्या अगोदर जाहीर करण्यात येणार असल्याचेही मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.

एलिमेंटरी चित्रकला श्रेणी परीक्षेचे वेळापत्रक

(२०२१-२२मध्ये नववीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी)

विषय : कालावधी : वेळ

  • वस्तुचित्र : ९ एप्रिल : सकाळी १०.३० ते दुपारी १

  • स्मरणचित्र : ९ एप्रिल : दुपारी २ ते ४

  • संकल्पचित्र-नक्षीकाम : १० एप्रिल : सकाळी १०.३० ते दुपारी १

  • कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन : १० एप्रिल : दुपारी २ ते ४

इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षेचे वेळापत्रक :

(२०२१-२२मध्ये इयत्ता दहावीत असणारे विद्याथी आणि कला शिक्षक प्रशिक्षण पदविका (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाचे विद्यार्थी)

विषय : कालावधी : वेळ

  • स्थिरचित्र : ११ एप्रिल : सकाळी १०.३० ते दुपारी १.३०

  • स्मरणचित्र : ११ एप्रिल : दुपारी २.२० ते सायंकाळी ४.३०

  • संकल्पचित्र-नक्षीकाम : १२ एप्रिल : सकाळी १०.३० ते दुपारी १.३०

  • कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन : १२ एप्रिल : दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT