महिला दिन : समाजापासून दुर्लक्षित आणि वंचित महिलांच्या सत्काराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिन

महिला दिन : समाजापासून दुर्लक्षित आणि वंचित महिलांच्या सत्काराचे आयोजन

पुणे : घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट. त्यातच कोरोनाने पतीचे निधन झाले. पती गेल्याने कुटुंबाचा आधार गेला आणि आभाळंच कोसळल्यासारखे झाले. पदरी दोन मुलं. त्यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्‍न पडला. शिक्षण तर दूरच. पण अशाही परिस्थितीत न डगमगता संसाराचा गाडा हाकलला. शिवाय मुलांच्या शिक्षणातही खंड पडू दिला नाही, हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. निमित्त होते जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्काराचे आणि अर्थातच सत्कारार्थी होत्या कोरोनात पतीचे निधन झाल्यानंतरसुद्धा आर्थिक परिस्थितीला न डगमगता, धुणीभांडी करून मुलांचे शिक्षण आणि संगोपन करणाऱ्या महिला. सत्कार झाला आणि सत्कारानंतर बोलताना या महिलांनी त्यांच्या या व्यथा मांडल्या.

जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यातील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने समाजापासून कायम दुर्लक्षित आणि वंचित असलेल्या महिलांच्या खास सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार समारंभात या प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते पतीच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या संसाराचा गाडा व्यवस्थितपणे हाकणाऱ्या कल्पना अशोक चव्हाण, अनुसया विनोद सोळंकी, अफसाना शफी मुजावर, आशा रवींद्र मोरे, रंजना संतोष मिश्रा या महिलांचा खास सत्कार करण्यात आला.

यावेळी या महिलांना शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह व साडी भेट स्वरूपात देऊन त्यांना गौरविण्यात आले. संधी मिळाली तर महिला काय करू शकतात हे जगाने वेळोवेळी पाहिलं आहे. म्हणूनच महिला सक्षम होणे आवश्‍यक आहे. महिला सक्षम झाल्या तर खऱ्या अर्थाने समानतेचे पर्व सुरु होईल, असे मत कामठे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी मधुकर धांडेकर, भरत धर्मावत, बजरंग वाघ, सुखदेव लोणकर ,शिवाजी मरळ ,चंद्रकांत गायकवाड, प्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे आदी उपस्थित होते. प्राचार्य भानुदास रिठे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका सुरेखा कोलते यांनी आभार मानले.

Web Title: Womens Day Society Corona Death Husband Wife

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top