cet exam sakal
एज्युकेशन जॉब्स

शिक्षक भरतीसाठी मे महिन्यात सीईटी, 15 हजार जागा भरती करण्याचा निर्णय

शिक्षक भरतीसाठी मे महिन्यात सीईटी घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या टीएटी पास धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मिलिंद देसाई

बेळगाव - शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) मे महिन्यात सीईटी (CET) घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या टीएटी पास धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिक्षण खात्याने राज्यात सहावी ते आठवीसाठी 15 हजार जागा भरती करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी सीईटी कधी होणार याची उत्सुकता टीईटीत पास झालेल्या परीक्षार्थीना लागून राहिली आहे.

मात्र शिक्षण खात्याने दहावी व बारावीची परीक्षा झाल्यानंतर सीईटी घेण्याचा निर्णय घेतला असून बारावीची परीक्षा मेच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस सीईटी होण्याची शक्यता आहे.

सीईटी झाल्यानंतर गुणवत्तेनुसार शिक्षकांची भरती होणार असून सीईटी चे लवकरच वेळापत्रक जाहीर होणार आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थींना ऑनलाइन ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागणार आहेत.

राज्यात 2 लाखांहून अधिक टीईटी पास धारक आहेत. त्यामुळे सीईटीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त आहेत. मात्र सरकारने 15 हजार जागा भरती करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे जागा कमी असल्याने सर्वच परीक्षार्थींचे सीईटीत गुणवत्ता मिळविण्याचे उद्धिष्ट असणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींनी अभ्यासाला सुरवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोन्यात मोठी घसरण! मात्र सहा महिन्यांत तब्बल 43 हजारांची वाढ; आजचा ताजा भाव काय?

Nashik Crime : नाशिक भोंदूबाबांचा अड्डा! दैवी शक्तीच्या नावावर 28 वर्षीय महिलेवर अत्याचार, 2 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये लॉजवर नेलेलं

Parner News: उष्माघातामुळे शिक्षिकेचा मृत्यू; पारनेर तालुक्‍यातील घटना, शाळा सुटल्यानंतर घरी निघाल्या अन् काय घडलं!

Ladki Bahin Yojana: चौदा लाख बहिणींचा लाभ बंद होणार; योजनेसाठी मुदती देऊनही टाळाटाळी, नेमकं काय कारण?

भारतासह अनेक देशांमध्ये इंटरनेट ठप्प होण्याचा धोका, इराण समुद्राखाली डिजिटल हल्ल्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT