DK Sivakumar in Hyderabad  eSakal
Election News

Telangana Assembly Election : काँग्रेसचा तारणहार हैदराबादमध्ये दाखल, विजयाच्या उंबरठ्यावर घोडेबाजार रोखण्यासाठी DK शिवकुमार सज्ज

Telangana Election Results : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हैदराबादला पोहोचले आहेत. ते हॉटेल ताजकृष्णा येथून मतमोजणी प्रक्रियावर लक्ष ठेवणार आहेत.

Sudesh

Telangana Assembly Election Results : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच काँग्रेस मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे. त्यामुळे याठिकाणी आपण नक्कीच विजय मिळवू असा विश्वास काँग्रेसला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार देखील हैदराबादला पोहोचले आहेत. ते हॉटेल ताजकृष्णा येथून मतमोजणी प्रक्रियावर लक्ष ठेवणार आहेत.

मतमोजणीवर ठेवणार लक्ष

शिवकुमार (DK Sivakumar) यांच्यासोबत कर्नाटकातून काही आमदार देखील तेलंगणामध्ये आले आहेत. प्रत्येक मतदारसंघात एक-एक आमदार पाठवण्यात येणार आहे. हे आमदार मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. विजेत्या उमेदवाराला सुरक्षितपणे हैदराबादला आणण्याची जबाबदारी कर्नाटकच्या आमदारांवर असणार आहे.

विजयापूर्वीच बॅनरबाजी

निकाल येण्यापूर्वीच काँग्रेसने ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. यामध्ये विजयी उमेदवारांची नावं देऊन त्यांचं अभिनंदन देखील केलं आहे. रेवंत रेड्डी, भट्टी विक्रमार्का, सीथाक्का, मधुयाश्की, मैनामपल्ली हनुमंथा राव, फिरोज खान, कोंडा सुरेखा, जगारेड्डी यांच्यासह अनेक उमेदवारांची नावं या बॅनर्समध्ये छापण्यात आली आहेत.

पहिल्या कलांमध्ये काँग्रेसला बहुमत

निवडणुकीचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसने या कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. बीआरएस मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे. तर भाजप आणि एमआयएम यांचा सुपडा साफ होण्याची चिन्हं दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT