Diwali Faral history  Esakal
फूड

Diwali Faral history : उत्तर प्रदेशातील गुजीयाला फराळात मानाचे स्थान; पहा करंजीचा प्रवास!

उत्तर प्रदेशाची स्वतःची वेगळी नवाबी खाद्यशैली आहे.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील मसालेदार पदार्थ आपण कधीतरी बदल म्हणून नक्की ट्राय करतो. तिकडचे कुरकूरीत आणि भरपूर मसालेदार पदार्थ प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेशाची स्वतःची वेगळी नवाबी खाद्यशैली आहे. यात बिर्याणी, कबाब, कोरमा, नहारी कुल्चे, शीरमल, जर्दा, रुमाली रोटी आणि वर्की पराठा रोटी अशा अनेक चमचमीत पदार्थांचा समावेश आहे. हे पदार्थ जसे आपल्या राज्यात आले तसे फराळात मानाचे स्थान मिळालेली करंजीही उत्तर प्रदेशातूनच लांबचा पल्ला गाठत महाराष्ट्रात आलीय. असं म्हणतात की, करंजी प्राचीन काळात शष्कुली या नावाने परिचित होती.

उत्तर प्रदेशात करंजीचे खरे नाव गुजिया आहे. गुजीया हा मैदा आणि खव्यापासून बनवलेल्या गोड पदार्थाचा एक प्रकार आहे. याला छत्तीसगडमध्ये कुसली, बिहारमध्ये पेडकिया, आंध्र प्रदेशात कज्जिकयालू म्हणून ओळखले जाते. उत्तर भारतात होळी आणि दक्षिण भारतात दीपावलीच्या निमित्ताने गुजीया बनवण्याची परंपरा आहे. 

गुजीयावरून जशी करंजी बनते. तसे, तसे बिहारची पारंपारिक डिश चंद्रकला बनवली जाते. याचा आकार गोल असून आतमध्ये ड्रायफ्रूट्सचे आणि खोबऱ्याचे गोड सारण भरून कडेला मुरड घातली जाते. आपल्याकडे खोबरं, रवा, साखर, वेलची घालून सारण तयार केले जाते. मैद्याची पोळी लाटून त्यावर सारण भरून मध्ये दुमडून पाण्याचा हात घेऊन ती पोळी अर्धचंद्राकार बनवली जाते. नंतर त्याला नक्षीदार चमच्याने कापून तळले जाते. तेव्हा कुठे कुरकूरीत करंजी तयार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT