Diwali Recipe: बिना पाकाचे बेसन लाडु कसे तयार करायचे ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

besan ladoo

Diwali Recipe: बिना पाकाचे बेसन लाडु कसे तयार करायचे ?

बेसनाचे लाडू दिवाळीच्या फराळात केला जाणारा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. हे लाडू करताना पाक करावा लागत नाही. त्यामुळे पाकाला घाबरणार्‍या मंडळींची सगळी भिस्त बेसनाच्या लाडूंवर असते. पाकाची भानगड नसल्यामुळे करायला सोपे पडतात.  बेसनाचे लाडू आणि गुळातले या काॅम्बिनेशनची कल्पनाच आपण केलेली नसते. पण करून बघा. अतिशय सुंदर चवीचे हे अलवार लाडू सगळ्यांना खात्रीने आवडतील. मस्त साजूक तुपातला खमंग बेसनाचा लाडू आणि तोही गूळ घातल्यामुळे अतिशय पौष्टिक असा लाडू

आपण दिवाळी स्पेशल खास पारंपरिक पदार्थाच्या काही वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत त्यातील सातवी रेसिपी आहे, दिवाळी स्पेशल बिना पाकाचे बेसन लाडु कसे तयार करायचे ?

हेही वाचा: Diwali Recipe: दिवाळी स्पेशल इंस्टन मैदा चकली कशी तयार करावी?

साहित्य

● 4 वाटी बेसन (डाळीचे पीठ)

● 3 वाटी चिरलेला गूळ

● 1 कप साजूक तूप

● 2 – 3 चमचा दूध

● 1 टीस्पून वेलची पावडर

● आवडीप्रमाणे सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ते)

● किसमीस

हेही वाचा: Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

कृती –

बेसनाचे लाडू करताना सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे बेसन अगदी व्यवस्थित भाजणे. मंद आचेवर 5 मिनिटे आधी बेसन कोरडेच भाजा.नंतर त्यात थोडे थोडे तूप घालून बेसन डार्क बदामी रंगावर हलके होईपर्यंत भाजा.

सुरवातीला बेसन भाजायला जड लागले तरी जसजसे भाजून होईल तसे तूप सुटून बेसन हलके होईल.

भाजताना गॅस मंदच ठेवा.बेसन व्यवस्थित भाजले गेले आहे असे जेव्हा वाटेल त्यानंतरही आणखी 5 मिनिटे भाजा.तुम्ही जेवढे पीठ घेतले आहे त्या प्रमाणात भाजायला वेळ लागेल.

हेही वाचा: Diwali Recipe: घरच्या घरी गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा कसा तयार करायचा?

बेसन पाहिजे तितके हलके झाले की त्यात 2 – 3 टेस्पून गरम दूध सावकाश घाला. दूध घातल्यावर बेसन फसफसून येईल आणि छान जाळी पडेल.दूध बेसनात संपूर्ण जिरेपर्यंत परतत राहा आणि मग गॅस बंद करा.

आता हे बेसन अगदी कोमट किंवा जवळ जवळ पूर्ण गार होऊ द्या.बेसन गार झाले की पॅनमध्ये चिरलेला गूळ घालून त्यात एक टेस्पून तूप घाला. मंद आचेवर गूळ फक्त पातळ किंवा मऊ करा.गुळाचा पाक करायचा नाहीये.

गूळ जस्ट पातळ झाला की गॅस बंद करा.गॅस बंद केल्यावर 5 मिनिटे गूळ गार करा.5 मिनिटांनी भाजलेल्या बेसनात हा गूळ घाला.वेलची पावडर आणि सुकामेवा घालून सगळं एकत्र करून छानपैकी मळून घ्या. किसमिस लावून लाडू वळा.