Shravan Somvar 2022 Esakal
फूड

Shravan Somvar 2022: घरच्या घरी उपवासाचा पौष्टिक चिवडा कसा तयार करायचा?

हा उपवासाचा पौष्टिक चिवडा तुम्ही काही खाऊ शकता.

दिपाली सुसर

आज श्रावणातील दुसरा श्रावण सोमवार त्यानिमित्ताने एक खास उपवासाच्या फराळाची रेसिपी आम्ही तुमच्या करता घेऊन आलो आहोत.

साहित्यः

1) एक वाटी नायलॉन साबूदाणा

2) थोडासा डिंक

3) एक वाटी शेंगदाणे

4) सुक्या खोबर्‍याचे काप

5) एक वाटी बटाट्याचा खिस (वाळवलेला)

6) काजू, बदाम, बेदाणे

7) चिवडा तळण्यासाठी तूप किंवा तेल

8) आपल्या अंदाजानुसार जिरे, मीठ, साखर, तिखट

कृती:

सर्वप्रथम लोखंडी कढईत तेल/ तूप गरम करावे.

नंतर मग सुरुवातीला नायलॉन साबूदाणा मंद गॅसवर तळून घ्यावा. त्यानंतर डिंक तळून घ्यावा,नंतर शेंगदाणे, खोबऱ्याचे काप तळून घ्यावेत.

नंतर मग बटाट्याचा खिस तळून घ्यावा.

आणि सगळ्यात शेवटी काजू, बदाम आणि बेदाणे, तळून घ्यावेत.

नंतर हे सर्व तळलेले पदार्थ एकत्र करुन टिशू पेपरवर टाकावे जेणेकरुन त्यातील तेल निघून जाईल. मग नंतर हे पदार्थ एका भांड्यात टाकून त्यावर मीठ, पिठीसाखर, तिखट भुरभुरून एकत्र करावे.

अशा रितीने घरच्या घरी तुमचा उपवासाचा चिवडा तयार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT