sandwich dhokla sakal
फूड

श्रावण विशेष : सँडविच ढोकळा

महिलांनो, श्रावण महिन्याच्या निमित्ताने विविध रेसिपी आपल्या भेटीला येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

साहित्य : रवा, ताक, पालक, गाजर, मटार, चीज, खायचा सोडा, मीठ, आलं, मिरची, नारळ.

कृती : रात्री दोन वाटी रवा ताकात भिजत घालावा. सकाळी पालक व गाजराची वेगवेगळी पेस्ट करावी .त्यात वाटलेली मिरची, मीठ व थोडा नारळ घालवा. भिजलेल्या रव्याचे दोन समान भाग करून त्यात थोडा खायचा सोडा घालवा. एका भागात गाजराची पेस्ट व दुसऱ्या भागात पालकाची पेस्ट मिसळावी. नंतर डब्याला तेल लावून त्यात प्रथम गाजर असलेला रवा पसरावा. त्यावर चीज घालावे मग त्यावर वाटलेला मटार घालवा परत चीज घालावे. त्यावर पालक असलेला रवा पसरावा. नंतर नेहमी प्रमाणे १५ ते २० मिनिटे ढोकळा वाफवून घ्यावा. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

- वैजयंती हिंगे, निगडी प्राधिकरण, पुणे

महिलांनो, श्रावण महिन्याच्या निमित्ताने विविध रेसिपी आपल्या भेटीला येणार आहेत. आपणही श्रावण महिन्यासाठी उपयुक्त अशा रेसिपी आम्हाला पुढील मेल आयडीवर पाठवू शकता. सोबत रेसिपीचे छायाचित्र आवश्यक आहे.

मेल आयडी : maitrin@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT