ganesh chaturthi tulas esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला तुळस का वाहू नये ? खरंच गणेशाने तुळशीला शाप दिला होता का?

Why Tulsi is not offered to Lord Ganesha? तुळस आणि गणेश यांच्यातील पुराणकथा: बाप्पाला तुळस का अर्पण केली जात नाही?

Pooja Karande-Kadam

Ganesh Chaturthi 2025 : आज गणपती बाप्पांचे आगमन होतआहे. मोठ्या जल्लोषात गणेशा घरोघरी विराजमान होणार आहेत. गणपती बाप्पा वर्षातून पाच दिवस, दिड दिवस जरी घरी येत असले तरी ते घरातीलच एक सदस्य असल्यासारखे आहेत.

लहानमुले तर बाप्पाला पाहून आनंदी होतात. काही पालक तर केवळ मुलांच्या हट्टापायी गणपती आणतात. गणेशाला 'आदिपूज्य' देव म्हटले जाते आणि तो लहान मुलांपासून मोठ्यांना प्रिय असतो. म्हणूनच गणेशोत्सवात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण नाचताना, गाताना दिसतात.

‘विघ्नहर्ता' गणेशाचे आगमन घरात प्रसन्नता आणते. बाप्पा घरातील विघ्न बाहेर दूर करतो म्हणूनच त्याची मनोभावे पूजा केली जाते. बाप्पाला दूर्वा आवडतात हे तर प्रत्येकाला माहितीय पण बाप्पाच्या पूजेत तुळस कधीही ठेऊ नये, किंवा बाप्पाला तुळस अर्पण करू नये, असे शास्त्रात सांगितले जाते, असे का यामागील कथा काय आहे हे पाहुयात.

गणेशाला तुळस अर्पण केल्यास पूजा मान्य होत नाही. याचे कारण असे की, एकदा गणेशजी गंगा नदीच्या तीरावर तपश्चर्या करत असताना ते पूर्णपणे ध्यानस्थ होते. तेव्हा धर्मत्वज राजांची कन्या तुलसी तिथे मैत्रिणींसोबत आली. गणेशाच्या त्या धानस्थ रूपाकडे पाहून तुलळ भारावली. तिने बाप्पाकडे तुमच्याशी विवाह करायचा आहे, अशी मागणी घातली. (Ganesh Chaturthi 2023)

पण, तिच्या या संभाषणामुळे बाप्पांची तपश्चर्या भंग झाली. त्यांनी डोळे उघडले ते रागातच. कोणताही विचार न करता त्यांनी तुलशीला शाप दिला. तुझे लग्न राक्षसाशी होईल, ते ऐकून तुलसीही क्रोधीत झाली आणि तिने बाप्पाला शाप दिला की तुझीही दोन लग्ने होतील.

त्यानंतर तुळशीला तिची चूक समजली आणि तिने माफी मागितली. त्यावर बाप्पा म्हणाले, 'आता मी माझा शाप परत घेऊ शकत नाही पण तू विष्णुप्रिया राहशील आणि तुझी उपस्थिती संपूर्ण पवित्र राहील.

स्थळ आणि तुझा सर्वत्र पूजनीय होईल. 'तुला माझ्या पूजेत कधीही सहभागी होता येणार नाही', त्यानंतर गणेशाच्या पूजेत तुळशीचा वापर करणे अशुभ मानले जाऊ लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT