major general babar iftikhar Sakal
ग्लोबल

अफगाणिस्तानवरील भारताचा प्रभाव कमी होईल; पाकिस्तानी मेजर

‘तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविला याचा पाकिस्तानला आनंद होत आहे.

वृत्तसंस्था

इस्लामाबाद - ‘तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळविला याचा पाकिस्तानला (Pakistan) आनंद होत आहे. यामुळे अफगाणिस्तानवरील भारताचा (India) प्रभाव (Pressure) कमी होईल, असा भारताबद्दलचा आकस पाकिस्तानच्‍या सैन्यदलाच्या ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’चे (आयएसपीआर) मेजर जनरल बाबर इफ्तिकार (Babar Iftikhar) यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

इतकेच नाही तर अफगाणिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीला भारतच जबाबदार असल्याचाही दावा केला पाकिस्तानमधील ‘जिओ टीव्ही’ यासंबंधी वृत्त दिले आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील परिस्थिती सामान्य आणि नियंत्रणात आहे. सीमेच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने आवश्‍यक उपाययोजना केली असल्याचे सांगून स्वतःचीच पाठ थोपटली. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास पाकिस्तान सज्ज आहे, असे सांगतानाच इफ्तिकार यांनी भारताविरोधात गरळ ओकली. अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यावर भारताचा प्रभाव कमी होईल. तेथे जे काही झाले त्यात भारताची भूमिका काय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे सांगतानाच भारताला अफगाणी लोकांबद्दल बिलकूल प्रेम नाही. इसिस’ आणि तहरीक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यासारख्या दहशतवादी संघटनांच्या मदतीने पाकिस्तानला धडा शिकविण्याच्या हेतूने त्यांनी त्यांनी अफगाणिस्तानचे नेते व सैन्यदलाच्या मनात विष कालविले आहे, अशीही बाष्कळ विधाने इफ्तिकार यांनी केली.

अमेरिकन सैन्य वापसीवर तुर्कस्तानची टीका

इस्तंबूल - ‘जगात सर्वांत ताकदवान असल्याचा दावा करणाऱ्या देशांनी ते जेथे गेले आहेत, तो प्रदेश सोडताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. अशा भाग दहशतवाद्यांच्या ताब्यात सोडणे हे अत्यंत धोकादायक आहे,’ अशा शब्दांत तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैय्यीप एर्दोगान यांनी अफगाणिस्तानातून सैन्‍य माघारीच्या अमेरिकेच्या निर्णयावर टीका केली. बोस्नियातील सारोजेव्हो येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT