तालिबान, आयएस-के आणि हक्कानी नेटवर्क, काय आहे संबंध?

laliban
laliban
Summary

आयएस-खुरासान (IS-Khorasan) , हक्कानी नेटवर्क (Haqqani Network) आणि तालिबान (Taliban)या तिघांनी जगाची डोकेदुखी वाढवली आहे.

नवी दिल्ली- आयएस-खुरासान (IS-Khorasan) , हक्कानी नेटवर्क (Haqqani Network) आणि तालिबान (Taliban)या तिघांनी जगाची डोकेदुखी वाढवली आहे. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाची जबाबदारी आयएस खुरासानने घेतली आहे. तालिबान आणि आयएस खुरासान एकमेंकांचे कट्टर शत्रू आहेत. पण, दोघांनाही अफगाणिस्तानमध्ये इस्लामी आमिरातची स्थापना करायची आहे. दोन्ही संघटनांमध्ये मदभेद असल्याचं तज्त्राचं मत आहे. असे असले तरी दोन्ही संघटनांची विचारधारा जवळपास सारखी आहे. यात, हक्कानी नेटवर्क तालिबानच्या अधिक जवळ आहे. वेळोवेळो ते एकमेकांना सहाय्य करत असतात. तिन्ही संघटनांबाबत थोडक्यात माहिती घेऊया आणि त्यांच्यात काय साम्य/भेद आहेत हे पाहूया...(Afghaniastan Latest News)

तिन्ही संघटनांबाबत थोडक्यात माहिती

आयएस-केपी

इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (आयएस-केपी) इस्लामिक स्टेटचे (आयएस) एक रुप आहे. माहितीनुसार, या संघटनेमध्ये अधिकतर दहशतवादी पाकिस्तानी आहेत. इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतला आयएसआयएस-के या नावानेही ओखळले जाते. या संघटनेकडे 1500 ते 2200 दहशतवादी असल्याचा अंदाज आहे. याची स्थापना पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेच्या जवळ झाली होती.

laliban
'जैश'च्या मसूद अजहरची तालिबान्यांशी भेट; काश्मीरवर हवाय ताबा

हक्कानी नेटवर्क

हक्कानी नेटवर्ककडे मोठे हल्ले घडवून आणू शकणारे कुशल दहशतवादी आहेत. हे दहशतवादी स्फोटके आणि रॉकेट बनवण्यात सक्षम आहेत. अलकायदा सोबत या संघटनेचे चांगले संबंध आहेत. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार, संघटना क्षेत्रीय आणि विदेशी कट्टरवादी संघटना आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा भागात सक्रिय दहशतवाद्यांमध्ये संवाद घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

तालिबान

पश्तून भाषामध्ये तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा होतो. उत्तर पाकिस्तानमध्ये 1990 च्या दशकात या संघटनेचा उदय झाला होता. असं सांगितलं जातं की, पश्तून लोकांनी हे आंदोलन सुन्नी इस्लामिक धर्माची शिक्षा देणाऱ्या मदरशांमधून उभे केले होते. रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये असलेल्या या मदरशांना फंडिंग सौदी अरेबिया करत होता. सुरुवातीच्या काळात तालिबान शांती आणि सुरक्षा स्थापन करण्याचा दावा करत होता. तसेच सत्तेत आल्यास इस्लामिक कायदा शरिया लागू करुन शासन करणार असल्याचं ते म्हणायचे. यासाठी संघटनेने हिंसक आंदोलन सुरु केले. तालिबाबने 1996 ते 2001 यादरम्यान शासन केले आहे. याकाळात महिलांचे अधिकार संकुचित करुन शरिया कायदा लागू करण्यात आला होता. पुन्हा एकदा तालिबान सत्तेत आला आहे.

laliban
स्पेनसह जर्मनी, स्वीडनने काबुलमधील 'बचाव मोहीम' थांबवली

या तीन संघटनांमध्ये काय आहे समानता

1. शरिया कायदा- अफगाणिस्तानमध्ये इस्लामी अमिरात आणि शरिया कायद्याची स्थापना करणे तिन्ही संघटनेचे लक्ष्य आहे

2. महिला शिक्षण, रोजगार-महिलांचे लिहिणे-वाचणे, नोकरी करण्याच्या विरोधात तिन्ही संघटना. असे असले तरी तालिबानने महिलांना काही अधिकार देणार असल्याचं म्हटलंय

3. पडदा प्रथा- तालिबान, आयएस-खुरासान आणि हक्कानी नेटवर्क महिला आणि मुलींना हिजाबमध्ये ठेवण्याच्या बाजूने आहेत

4. पश्चिमी देशांचा विरोध- तिन्ही संघटनांनी अमेरिका आणि नाटो गटाला आणि त्यांच्या समर्थकांना विरोध केला आहे

laliban
अमेरिकेनं घेतला काबुल बॉम्बस्फोटाचा बदला, इसीसच्या तळावर एअर स्ट्राईक;पाहा व्हिडिओ

कोणत्या मुद्द्यावरुन आहे वाद

1. विचारधारा सारखी असली तरी तालिबान आणि आयएस-खुरासानमध्ये संबंध फाटलेले आहेत. हक्कानी नेटवर्क यांच्या दोघांमधील दूवा म्हणून काम करत असते.

2. तालिबानने जागतिक इस्लाम पंथाऐवजी राष्ट्रवाद आणि जातीय आधारावर संघटना उभी केल्याचा आरोप आयएस खुरासान करते

3. आयएस खुरासानने दोहामध्ये अफगाणिस्तानातील विदेशी शक्तींच्या वापसीसंबंधी तालिबानने केलेल्या शांती कराराचा विरोध केला होता

4. तालिबान आणि त्यांच्या नेत्यांनी जिहादचा मार्ग सोडला असल्याचा आरोप आयएस खुरासान करत असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com