1) यंगून : म्यानमारमधील लष्करी सत्तेविरोधात नागरिकांनी रविवारी मोठ्या प्रमाणावर शांततापूर्ण निदर्शने केली. 2) सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना गुलाबाचे फूल देणारी तरुणी. 
ग्लोबल

म्यानमारमध्ये आंदोलन अधिक तीव्र; स्यू की यांना सोडण्याची मागणी

पीटीआय

यंगून - म्यानमारमधील लष्करी बंडाच्या विरोधात आज हजारो नागरिकांनी मोर्चा काढत देशाच्या नेत्या आँग सान स्यू की यांना मुक्त करण्याची मागणी केली. या मोर्चामध्ये जवळपास दोन हजार कामगार संघटना आणि विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

म्यानमारमध्ये एक फेब्रुवारीला बंड होऊन लष्कराने लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता ताब्यात घेतली. देशाच्या अध्यक्षांसह प्रमुख नेत्या आँग सान स्यू की यांनाही ताब्यात घेतले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. या लष्करीबंडाविरोधात जनतेने आवाज उठविला आहे. गेल्या सोमवारपासूनच निदर्शने सुरु असून आज मोठ्या प्रमाणावर नागरिक त्यात सहभागी झाले होते. निदर्शक स्यू की यांच्या समर्थनाच्या घोषणा देतानाच लष्करी नेतृत्वावर उघडपणे टीका करत होते. यंगूनमध्ये मुख्य मोर्चा निघाला होता. निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा फवाऱ्याचा मारा केला. 

म्यानमारमध्ये जवळपास पाच दशकांच्या लष्करी राजवटीनंतर २०१५ मध्ये लोकशाहीवादी सरकार स्थापन झाले होते. लष्करी राजवटीच्या काळात हा देश उर्वरित जगापासून वेगळा पडला होता. येथील नागरिकांचाही बाहेरच्या जगातील लोकांशी फारसा संपर्क नव्हता. २०१५ मध्ये स्यू की यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यावर लोकांना प्रभावी लोकशाहीची आशा निर्माण झाली होती. सध्याच्या लष्करी बंडानंतर पुन्हा एकदा हा देश मागे जाण्याचा धोका निर्माण झाला असल्यानेच जनतेने मोठी निदर्शने सुरु केली आहेत. 

अमेरिकेचे आवाहन
म्यानमारमधील अमेरिकेच्या दूतावासाने येथील लष्कराला सत्ता सोडण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीमार्गाने निवडून आलेल्या सरकारची स्थापना करावी, ताब्यात घेतलेल्यांना सोडून द्यावे आणि संपर्क पुन्हा प्रस्थापित करावा, असेही अमेरिकेने लष्कराला सांगितले आहे. म्यानमारमध्ये सध्या सुरु असलेल्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. 

इंटरनेट सेवा बंद
लष्करी बंडाविरोधातील आंदोलन अधिकच तीव्र झाल्यानंतर म्यानमारमधील लष्करी सत्तेने आज देशाच्या बहुतांश भागातील इंटरनेट सेवा बंद केली. फेसबुकला त्यांनी आधीच ‘ब्लॉक’ केले होते. आता संपूर्ण इंटरनेट सेवाच बंद केल्याचे दिसून येत आहे. कालपासूनच (ता. ६) लोकांना इंटरनेट कनेक्शन मिळताना अडचणी येत होत्या. आज ही सेवाच बंद झाल्याचे दिसून आले. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News :दीक्षाभूमी विकासाच्या संथ गतीवर उच्च न्यायालयाचा संताप; आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

Satara Rare Softshell Turtle : निसर्गाची किमया! साताऱ्यात आढळले मऊ पाठीचे आणि लांब मानेचे दुर्मीळ कासव; वाघाप्रमाणं मिळतंय कायदेशीर संरक्षण, वैशिष्ट्ये काय?

MPSC Success Story: आईने खानावळ चालवली, वडील माथाडी कामगार; लेकीने MPSCत गाजवले नाव, विशाखा शिर्केंची प्रेरणादायी यशोगाथा

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

SCROLL FOR NEXT