मॉस्को - लाल चौकाजवळील निवासी भागात रविवारी व्हॅलेंटाइन डेनिमित्त समर्थकांनी मोबाईलचा फ्लॅशलाईट लावून राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांना पाठिंबा दर्शविला. (एएफपी) 
ग्लोबल

नवाल्नी यांच्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’

यूएनआय

मॉस्को - राजकीय विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांना पाठिंबा देण्यासाठी रशियातील असंख्य नागरिकांनी व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधले. समर्थकांनी मोबाईलचा फ्लॅशलाईट लावून किंवा मेणबत्त्या प्रज्ज्वलित करून परिसर उजळून टाकला.

पॅरोलच्या अटींचा भंग केल्याच्या कारणावरून नवाल्नी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी उत्स्फूर्त निदर्शने होत आहेत. गेल्या काही आठवड्यांत हजारो समर्थकांना ताब्यात घेण्यात आले असून तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांवरील निदर्शने वसंत ऋतू सुरु होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत, मात्र नवाल्नी यांना भक्कम पाठिंबा असल्याची कृती करण्याचा उद्देश व्हॅलेंटाइन डेमुळे साध्य करता आला. घराबाहेर येऊन १५ मिनिटांसाठी समर्थकांनी फ्लॅशलाईट लावले. काही ठिकाणी ह्रदयाच्या आकारात मेणबत्त्या लावण्यात आल्या.

सर्वदूर सहभाग
असंख्य समर्थकांनी मेणबत्ती लावल्याचे किंवा फ्लॅशलाईट सुरु केल्याची छायाचित्र सोशल मिडीयावर पोस्ट केली. पूर्व सायबेरीयामधील इर्कुत्स्क, उरल पर्वतराजीतील येकातेरीनबर्ग आणि पश्चिम सायबेरीयातील नोवोहोसीबीर्स्क अशा सर्वदूर समर्थकांचा सहभाग होता. सहभागाचे प्रमाण छोटे असले तरी ते उत्स्फूर्त होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘पुतीन भीती, नवाल्नी हे प्रेम’
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विमान प्रवासात नवाल्नी यांची प्रकृती अचानक ढासळली. आपल्यावर विषबाधा झाल्याचा आणि यास रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. जर्मनीत उपचार मिळाल्यामुळे नवाल्नी सावरले. तेथून मायदेशी परत येताच त्यांना अटक झाली. त्यांचे खंदे समर्थक लिओनिद वोल्कोव आंदोलकांना एकत्र आणत आहेत. रविवारी अशी कृती करण्याचे आवाहन त्यांनीच सोशल मिडीयावर केले होते.

पुतीन म्हणजे भीती, तर नवाल्नी हे तर प्रेम. म्हणूनच आपण जिंकू, अशा शब्दांत त्यांनी साद घातली. व्होल्कोव यांच्याविरुद्ध रशियन सरकारने आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी केले आहे. सध्या ते लिथुआनियामध्ये आहेत. २०१९ मध्ये रशियन सरकारने नवाल्नी यांच्या भ्रष्टाचारविरोधी प्रतिष्ठानमधील अफरातफरीप्रकरणी व्होल्कोव यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT