'अश्रू धुराचा वापर झाला नव्हता म्हणून आंदोलकांवर घेतली चाचणी'

pak minister rashid
pak minister rashid

इ्स्लामाबाद - नेहमीच वादग्रस्त अशा वक्तव्यांनी चर्चेत राहणारे पाकिस्तानच्या सरकारमधील मंत्री शेख रशीद यांनी आता आणखी एक वक्तव्य केलं आहे. पगारवाढीवरून होत असलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्यांच्या वापराबाबत रशीद म्हणाले की, अश्रू धुराच्या नळकांड्यांची टेस्ट करणं गरजेचं होतं. बराच काळ त्यांचा वापर झाला नव्हता. 

पाकिस्तानमध्ये पगारवाढीसाठी सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला होता. याबाबत माहिती देताना पाकचे मंत्री शेख रशीद अहमद यांनी म्हटलं की, अश्रू धुराच्या नळकांड्याची टेस्ट करण्याची गरज होती. कारण बराच काळ त्याचा वापर करण्यात आला नव्हता. 

रावळपिंडीतील एका कार्यक्रमात शेख रशीद बोलत होते. त्यांनी म्हटलं की, इस्लामाबाद पोलिसांनी थोड्या अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मारा केला. हे  चाचणीसाठी आवश्यक होतं कारण अश्रू धुराचा वापर बराच काळ झाला नव्हता. फक्त एक लहान चाचणी झाली होती यापेक्षा जास्त काही नाही झालं.

डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी समितीचे सदस्य राहिलेल्या रशीद यांनी सांगितलं की, खरी अडचणी अश्रूधुरांचा मारा करण्याची नव्हती तर ही होती की, वेतन हे महागाईच्या काळात अब्जावधी रुपयांचे आहे. यामुळे देशाच्या तिजोरीवर ताण येत आहे. 

पाकिस्तान पोलिसांनी 10 फेब्रुवारीला वेतन आणि पेन्शनमध्ये वाढीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर अश्रूधुराचा मारा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर मंत्री शेख रशीद यांनी केलेल्या वक्तव्याने संताप व्यक्त केला जात आहे.  या वक्तव्याबाबत रशीद यांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

पीएमएलएनचे नेते मोहम्मद जुबैर यांनी म्हटलं की,'कोणत्याही इतर देशांमध्ये अशा प्रकारच्या वक्तव्याचा एकच अर्थ निघेल की मंत्री तत्काळ गोळीबाराला योग्य ठरवतात आणि पुन्हा सरकारकडून माफी मागितली जाते.' हारुज रियाज यांनी ट्विटरवरून म्हटलं की, शेख रशीद यांच्या म्हणण्यानुसार लोकांना ठार करणं म्हणजे एक मजा आहे.

पगारवाढीसाठी जवळपास 2 हजार आंदोलक एकत्र झाले होते. त्यांनी संसद भवनावर मोर्चा नेण्याची तयारी केली होती. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याआधी रशीद यांच्यासह अनेक मंत्र्यांनी म्हटलं होतं की, सरकार आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करेल. विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सरकारने आंदोलकांबाबत केलेल्या कृत्याचा निषेध केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com