saish veera 
ग्लोबल

Indian Killed in US: अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

रवींद्र देशमुख

Indian Student Killed in US : अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आंध्र प्रदेशातील 24 वर्षीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील ओहायो येथील एका इंधन केंद्रावर गोळी लागल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो तिथं काम करत होता.

साईश वीरा असे या विद्यार्थ्याचे नाव असून कोलंबस राज्यात गुरुवारी ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार वीरा हा आंध्र प्रदेशचा रहिवासी होता.

माहितीनुसार, "20 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12:50 वाजता, कोलंबस पोलिस अधिकाऱ्यांना डब्ल्यू. ब्रॉड सेंटच्या 1000 ब्लॉकमध्ये कथित गोळीबाराचा अहवाल मिळाला. तिथं पोचल्यावर, पोलिसांना साय विरा एम. जखमी झाल्याचे आढळले. कोलंबस फायर सेवा कर्मचारी आले आणि त्यांनी जखमी विद्यार्थ्याला स्थानिक रुग्णालयात नेले.

डॉक्टरांनी साईश विराचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला वाचविण्यात यश आलं नाही. पोलिसांनी सांगितले की, घटनेची चौकशी केली जात आहे. मृताच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली असून डिव्हिजन पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारे संशयिताचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे.

साईश वीरा अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेत होता. तो H-1B व्हिसावर अमेरिकेत गेला होता. यालामंचिलीने सांगितले की पुढील तो दोन आठवड्यांत इंधन स्टेशनवरील लिपिक म्हणून करत असलेली नोकरी सोडणार होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT